अखील भारतीय माळी महासंघाचा माळी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा कृतीशील आराखडा जाहीर
अकोला – नागपूर येथे रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी अखील भारतीय माळी महासंघाचा विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळावा आमदार निवास नागपूर येथे संपन्न झाला. मेळाव्याला उद् घाटक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष विलासजी पाटील उपस्थित होते, तर सभेचे अध्यक्षस्थान डी के बापू माळी यांनी भुषविले.
या सभेला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्ष ॲड राजेंद्र महाडोळे तसेच विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव, अकोला, विश्वस्त शिवदासजी महाजन पुणे, तारकाताई विवरेकर धुळे, प्रतिमाताई माळी, नंदुरबार, विजयजी सोनवणे धुळे, श्रीकृष्ण बनसोड अमरावती, निमंत्रित डॉ प्रकाश ढोकणे, विदर्भ संघटक प्रविण पेटकर, विदर्भ उपाध्यक्ष अनिल डोंगरवार, तसेच अकोला जिल्हाध्यक्ष ॲड प्रकाश दाते, यवतमाळ – दादा गुरनुले, राजेंद्र घाटे, गोंदिया – देविदास गुरनुले, भंडारा – डॉ श्रीकांत भुसारी, चंद्रपूर – नानाजी आदे, वर्धा – गजानन सोनुले, तसेच महीला जिल्हाघ्यक्षा अकोला सौ भारतीताई शेंडे, सौ गायत्री ईरले, सौ अर्चनाताई ऊडाखे, सौ माधुरी देशकर, सौ किरण बिडकर, सौ ऊषा शेंडे, सौ निमंत्रीता कोकुर्डे, सौ संगीत कोकुर्डे, ईत्यदिंच्या ऊपस्थीतीत सभा संपन्न झाली.
या सभेमधे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बेरोजगार युवक, महीलांचे सक्षमीकरण, समृद्ध शेतकरी व शैक्षणिक धोरण, या बाबत सभेमध्ये सखोल मंथन होऊन समाजाच्या विकासाच्या उद्देश पुर्तीचा कृतीशील आराखडा जाहीर करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेतली.
सभेला संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन राजेंद्र मांदाडे तर आभार अनिल किरणापुरे यांनी मांनले.