आपला जिल्हा

बहुजन संत महापुरुषांच्या विचारधारेला हत्यार बनवून मनुवादी दडपशाही विरुद्ध लढा -कविताताई कर्डक

नाशिक – दि. १८ | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहर विभागाचे एकदिवशी शिबिर लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी, नाशिक. येथे संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन दिलीप खैरे राज्य उपाध्यक्ष, बाळासाहेब कर्डक राज्य उपाध्यक्ष, समाधान जेजुरकर चिटणीस, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदुरे यांनी विषमता-जातिवाद-खाजगीकरण-धार्मिक दहशतवाद  नावाच्या प्रतीकात्मक हन्ड्या फोडून केले.

शिबिरात कविता ताई कर्डक यांनी समानतेच्या विचारधारेवर ज्या महापुरुषांनी व संतांनी आपले आयुष्य खर्च केले त्यांच्या जीवन कार्य व विचारांना उजाळा दिला.l

बहुजन समाजाला संघटित करण्यासाठी संत व महापुरुषांचे विचार हे माळेच्या धागे प्रमाणे समाजातील विविध जातींना एका माळेत गुंफण्याचे काम तर करतीलच परंतु मनुवादा विरुद्ध लढण्यासाठी संत -महापुरुषांचे विचार हेच हत्यार् म्हणून वापरावे लागेल. अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.

ऍड. प्रतीक दादा कर्डक यांनी आरक्षण हे आर्थिक सक्षमतेचा कार्यक्रम नसून समाजातील मागास घटकाला त्याने वर्षानु वर्ष सोसलेले अन्याय अत्याचारातून आलेल्या सामाजिक मागासलेपणा दूर करण्याचा कार्यक्रम आहे त्यातही सद्यस्थितीला सरकारी जागेवर फक्त 0.4% सरकारी नोकऱ्या आरक्षणातून भरल्या जाणार आहेत कारण दिवसेंदिवस् सरकारी उद्योग खाजगी कंपन्यांना विकले जात आहे त्यामुळे आरक्षण संपुष्टात येत आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिबिराला रवींद्र शिंदे अमोल नाईक, संतोष भुजबळ, अमोल पैठणकर, करण आरोट, योगेश निसाळ, कुनाल् पैठणकर आशुतोष चव्हाण, प्रदीप सुरवाडकर,आकाश मस्के, सचिन खरात, गोबाजी जाधव, सुरेश बाविस्कर, निलेश पाटील, बापूसाहेब मगर, गणेश निंबारे, वृषाली महाजन, संस्कृती चौधरी गवारी, अमर जगताप, रोहित शिंदे, स्वप्निल कासार, सुभाष पानपाटील, महेंद्र निंबारे, गणेश घारे, जयेश पिंपळकर, राहुल महाजन,  श्रुतिका वाघ, रिविराज बिराडे, आकाश मस्के, सागर मरवत, धनंजय थोरात, सचिन जगताप, प्रशांत पुंड, ज्ञानेश्वर महाजन, श्रीधर कटारे, सुनील देवरे, सय्यद पटेल,

श्रीकृष्ण काळे, संतोष पुंड, दीपक गांगुर्डे, भरत जाधव, मुखे झनके, उमेश आव्हाड, वैभव जावळे, अनिल नळे, अरुण थोरात, हिराबाई खैरनार, वृषाली खैरनार, पशुवळ पाटील, रूपाली तायडे, दिपाली बोराडे, सपना माळी, विद्या वर्पे, हर्षदा वर्पे, क्रांती जाधव, वैशाला गांगुर्डे, सरला अहिरे, सुमन एवढे, एम आर मोकळ, निषा झणके, संध्या बोराडे, किरण दिवसाने, सुभाष उगले, प्रमोद केदारे, संगीता पाटील, दिलीप नागरे, यशवंत शिरसाट, योगेश दिवे, सुनील घुगे, ज्ञानेश्वर महाजन, आबा महाजन, सुरेश दिवे, राकेश मोरे, अशोक मंडळी, मच्छिंद्र माळी, रूपाली संजीवनी, सुरेश शिंदे, निलेश पाटील, संजीवनी जाधव इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button