आमदार संजय गायकवाड व पुत्र कुणाल विरोधात खामगावात माळी समाजाचा निषेध व मुख्यमंत्र्यांना निवेदन
खामगाव- दि. 08 | बुलढाणा येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात शिवसेना व शिंदे गटामध्ये झालेल्या वादामध्ये माळी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा सिंदखेद राजाचे माजी नगराध्यक्ष छगनराव मेहेत्रे यांना जातीवाचक अपशब्द शब्द उच्चारून झालेला हल्ल्याचा निषेध म्हणून आज माळी समाज खामगाव तालुका तर्फे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.[ads1]
सदर निवेदनात नमूद आहे की, दिनांक 3 सप्टेंबर 2022 ला बुलडाणा येथे शिवसेना पक्षाच्या कार्यक्रमात मा आमदार श्री संजय भाऊ गायकवाड यांच्या पुत्राने माळी समाजाचे नेते, मार्गदर्शक, सिंदखेडराजा येथील माजी नगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री छगनराव मेहेत्रे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण व लोटपाट केली. वास्तविक मागील बुलडाणा विधानसभा निवडणूकीत आमदार श्री संजय भाऊ गायकवाड यांना माळी समाजाने सुद्धा मतदान करून त्यांच्या विजयामध्ये खारीचा वाटा उचलला आहे. मात्र त्यांच्या पुत्राने केलेल्या जातीवाचक शिवीगाळ मध्ये त्यांच्या मनात माळी समाजाबद्दल हीन भावना दिसून येथे त्यामुळे त्यांनी श्री छगनराव मेहेत्रे यांना जातीवरून शिवीगाळ केली,
वास्तविक सदर कार्यक्रम हा शिवसेना पक्षाचा होता त्यामध्ये माळी समाजाचा उल्लेख करायचा काही एक कारण नव्हते. तसेच पत्रकार परिषदेत सुद्धा आमदार श्री संजय भाऊ गायकवाड यांनी श्री छगनराव मेहेत्रे यांच्या बद्दल अपशब्द काढले. त्यामुळे श्री कुणाल गायकवाड व त्याचे पिता आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी केलेल्या कृत्यामुळे जिल्ह्यातील सर्व माळी समाजाच्या भावना दुखावल्या असून आम्ही सर्व समाजबांधव या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.[ads3]
तसेच या निवेदना द्वारे विनंती की पक्षाने संबधितांवर कारवाई करून मा आमदार संजय ‘भाऊ गायकवाड यांनी माळी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत माळी समाजाला आपली भूमिका घ्यावी लागेल याची नोंद असावी, करितां आम्ही समाजबांधव निवेदन देत आहोत.
निवेदनावर माळी सेवा मंडळ अध्यक्ष प्रल्हाद बगाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग सचिव अजय तायडे, माळी समाज युवा नेते जयेश वावगे, शेगाव मेळावा अध्यक्ष विजय वावगे, विजय बोडदे, विजय बंड, अशोक सपकाळ, डॉ.सुनील सातव, देविदास उमाळे, शंकरराव वानखडे, संतोष बोचरे, डॉ. अनंत डवंगे, गणेश खिरोडकर, रामभाऊ बोचरे, प्रविण माळी, राजेंद्र बोचरे, पंकज सातव, राजू वानखडे, अनिल क्षिरसागर, डॉ. भास्कर चरखे, दत्ता जावळकार, स्वराज भोपळे, राहुल चौधरी, आकाश वानखडे, सागर राऊत, सूरज भोपळे, पवन सातव, प्रणव वानखडे, शिवदास पारस्कर, मनोज सुडोकर, नितेश वानखडे, महादेव वानखडे, केशव इंगळे, सुदाम इंगळे, विशाल बोचरे, तुषार वावगे, योगेश बोचरे, विष्णु भोपळे, सुरेश लोखंडे, महादेव बनकर, गोपाल राऊत, धीरज मानकर, हरिओम सातव यासह बहुसंख्य समाजबांधवांच्या सह्या आहेत.