आपला जिल्हा

अन भर पावसात गावकऱ्यांनी गोळा केली शाळेसाठी लोकवर्गणी

खामगाव – दि. १५ | तालुक्यात चिखली बु. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात भर पावसात साजरा करण्यात आला.[ads1]
याप्रसंगी मोठ्या प्रमाणात गावकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष निलखन यांनी शाळेच्या काही समस्या गावकऱ्यांसमोर मांडल्या असता गावकऱ्यांनी लगेच लोक वर्गणी करण्यासाठी तयारी दाखवली व त्याच ठिकाणी उपस्थित गावकऱ्यांनी दहा हजार लोक वर्गणी गोळा केली.
15 ऑगस्ट रोजी सगळीकडे पाऊस सुरू होता तरी गावातील युवा कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी संपूर्ण गावात फिरून पुन्हा चौदा हजार वर्गणी गोळा केली. भर पावसामध्ये गावकऱ्यांनी शाळेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी केलेली लोक वर्गणी परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.[ads3]
ह्या लोकवर्गणी गोळा करण्यात  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कळसकार,राजू  मानकर, विजय लाहुडकार, प्रकाश मानकर ग्रामपंचायतचे सदस्य कैलास  साबे, मनोज पाटील पालक वर्गातून गंगाधर मानकर, अमोल पाटील, सागर पाटील, अमोल लाहुडकार, संजय रायपूरे, दत्ता ताठे तसेच गावातील नागरिक यांनी सहभाग घेतला अशाच प्रकारे गावाचा शाळेमध्ये सहभाग वाढल्यास शाळेची प्रगती होण्यास हातभार लागेल एवढे मात्र खरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button