आपला जिल्हामहाराष्ट्र

Baliram Sirskar will join BJP : बाळापूरचे मा. आमदार बळीराम सिरस्कार भाजपच्या वाटेवर -20 ऑगस्टला घेणार प्रवेश

मुंबई/बाळापूर – दि. 12 | बाळापूर मतदार संघाचे दहा वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार बळीराम सिरस्कार (Baliram Siraskar) यांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.[ads1]

Baliram Siraskar With Devendra Fadanvis
मुंबई येथे बळीराम सुरस्कर यांनी ११ऑगस्टला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली

अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक प्रतिमा असणारे व सर्व सामान्य जनतेची समरस असणारे व्यक्तिमत्व म्हणून बळीराम सिरस्कार (Baliram Siraskar) यांच्याकडे पहिल्या जाते. त्यांच्या या भाजप नेत्यांच्या भेटीने ते भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे (Baliram Sirskar will join BJP). त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बळीराम सिरस्कार (Baliram Siraskar) हे दिनांक 20 ऑगस्ट रोजी अकोला येथे श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करणार Baliram Sirskar will join BJP असल्याची सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे बाळापुर मतदार संघाचे सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बाळापूर मतदार संघात सत्तेची नवी सूत्रे जुळणार असून येणाऱ्या काळात बाळापूरचे आमदार म्हणून बळीराम सिरस्कार (Baliram Siraskar) पुन्हा नव्या उमेदीने राजकारणात सक्रिय होतील.

त्यांचा (Baliram Siraskar) भाजप Baliram Sirskar will join BJP प्रवेश 20 ऑगस्ट रोजी अकोला मधील सावित्रीबाई  फुले शिक्षण प्रसारक मंडळ, मोठी उमरी  प्रांगणात कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांसह होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button