आपला जिल्हा

महाराष्ट्र राज्य माळी कर्मचारी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आढाव यांची निवड

सिंदखेडराजा- दि. 04   |माळी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संघटन करणे, विविध प्रश्नाबाबत वाचा फोडणे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांचे सत्यशोधक विचार घराघरात पोहोचविणे या उद्देशाने कार्यरत असलेली संघटना म्हणजेच महाराष्ट्र राज्य माळी कर्मचारी महासंघ. संपूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेचे जाळे पसरलेले आहे.[ads1]

आज दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी सिंदखेड राजा येथे नरेंद्रजी वानखेडे प्रदेशाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली संघटनेची सभा पार पडली. सर्वप्रथम प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तालुका कार्यकारणीच्या वतीने नरेंद्रजी वानखेडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .

सिंदखेडराजा तालुका संघटनेमार्फत केलेल्या कामाची माहिती तालुकाध्यक्ष संजय ठाकरे यांनी दिली. नरेंद्रजी वानखेडे यांनी प्रकाशराव आढाव यांची बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी सौ वानखेडे , सौ आढाव आणि सौ अनिता मेहत्रे या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे दत्ता खरात भाऊराव ठाकरे , रंजनराव केळकर तुळशीदास चौधरी , संजय चौधरी ग्रामसेवक, दासा मेहेत्रे गणेश चौधरी , कृष्णा आढाव ही मंडळी उपस्थित. प्रकाश आढाव यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर सर्व कर्मचाऱ्यांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button