आपला जिल्हा

अकोट येथे वडीलाच्या जयंती प्रित्यर्थ शेतमजूर व बैलजोडी धारकांचा सत्कार

अकोट- दि. 25 | येथील नंदिपेठ येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा व सत्कार समारंभ चे आयोजन श्री नंदीकिशोर मंदिरामध्ये करण्यात आली असता सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन व त्यानंतर स्वर्गीय किशोरराव निमकर यांच्या फोटो प्रतिमेचे व शिव, फुले, आंबेडकर यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती अल्का किशोर निमकर या लाभल्या असता या कार्यक्रमाला शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक मार्गदर्शक अमृतराव देशमुख जिल्हा येवतमाळ, डॉ. संदीप हाडोळे, महेश दादा गणगणे ,कुलदीप देशमुख ता. कृ.अ.सुशांत शिंदे ,अशोक अमानकर यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी लाभले असता शेतकऱ्यांमधील विविध प्रकारच्या कपाशी, सोयाबीन पिकावर येत असलेल्या रोगराई व तसेच पिकांमध्ये उत्पन्नाची भर कशी करावी, उत्पन्न कसे काढावे फवारणी कशी करावी या संबंधित सर्व माहिती शेतकरी वर्गाला देण्यात आली[ads1]

प्रमुख पाहुणे जगन बगाडे गजानन वानखडे, इजाज भाई, संजय आठवले, अनंत गावंडे, कैलास निमकर प्रमुख उपस्थिती लाभली असता पाहुण्यांच्या हस्ते बैल जोडी धारक व शेतमजूर यांचा पुष्प गुच्छ शाल श्रीफळ व बोधचिन्ह देऊन पुरुष व महिला यांचा सन्मान करण्यात आला. शेतकरीम मेळाव्याचे तालुक्यामधील पहिलेच अनोखे व मार्गदर्शन शेती मेळावा करण्यात आलेला हा एक वेगळा वेगळा उपक्रम अकोट तालुक्यामध्ये सर्वप्रथम आयोजन प्रास्ताविक मयूर निमकर यांनी करून शेतकर्याचे मनोबल वाढविले, कार्यक्रमाला अनेक तालुक्यामधून शेतकऱ्यांची हजेरी लागली होती. सूत्रसंचालन प्रवीण हुसे तर आभार निलेश नेमाडे यांनी पार पाडले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button