आपला जिल्हा
किशोरराव निमकर यांच्या जयंती प्रित्यर्थ भव्य शेतकरी मार्गदर्शन व सत्कार समारंभ चे आयोजन
अकोट – दि. २५ | येथे आज भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा व सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अमृत पॅटर्न चे जनक श्री अमृतराव देशमुख, तसेच मा. डॉ. श्री संदीप हाडोळे सर व श्री कुलदीप देशमुख सर हे असणार आहेत.
शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन त्याच बरोबर या कार्यक्रमांमध्ये बैल जोडी धारक व शेतमजूर यांचा सत्कार घेण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून अशोकराव अमानकर, महेश दादा गणगणे , संजय बोडखे , मडके साहेब तहसीलदार अकोट, मिलिंद वानखडे एस डी ओ कृषी विभाग, तसेच तालुका कृषी अधिकारी अकोट, हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मयुर किशोरराव निमकर व जय भोलेनाथ शेतकरी उत्पादक गट व तालुका कृषी अधिकारी अकोट यांनी केले आहे.