सावता सेना महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदी तुकाराम सातव यांची निवड
म्हैसगाव -जि. सोलापूर- दि. २१ | येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सातव यांची सावता सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा सावता सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे .
सावता सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे यांनी तुकाराम सातव यांना निवडीचे पत्र दिले याप्रसंगी सावता सेना परभणी जिल्हाध्यक्ष राम जाधव, हिंगोली युवक जिल्हा अध्यक्ष आकाश सोनवणे, परभणी जिल्हा संघटक कृष्णाजी रासवे, मराठवाडा प्रवक्ते उद्धव समिंद्रे यांची उपस्थिती होती.
निवड झाल्याबद्दल तुकाराम सातव यांचे संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर यांचे यांचे सतरावे वंशज ह भ प दादा महाराज वसेकर, बाळासाहेब शिंदे, विष्णू देवकर, पुष्पराज आगरकर, संतोष यादव, शिवाजी मामा माळी, गणेश माळी, दिनेश ढोपे, प्रदीप माळी, दीपक शिंदे, संतोष भुजबळ, श्रीकांत माळी, देविदास भानवसे, अमोल नाळे, गणेश ढगे, विराजखुणे, भारत बोरगावकर, लक्ष्मण बोरगावकर, देविदास सातव. तसेच सावता सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा तालुका शहर सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले