आपला जिल्हा
नाईक खेतान महाविद्यालयात जागतिक योग दिन संपन्न
अकोला –स्थानिक सुधाकरराव नाईक कला, विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यलयात दि २१ जुन रोजी ‘जागतिक योग दिन‘ कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत बोबडे यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ नितीन देऊळकार यांनी योगाचे महत्व सांगितले. तसेच योगा व प्राणायाम चे प्रात्याक्षिक उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी यांचे सोबत करण्यात आली. या वेळी महाविद्यलयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा नेमिचंद चव्हाण, डॉ.गजेंद्र वासनिक, डॉ.मनोज सोनोने, डॉ.संगीता तिहिले, प्रा राधा मुरुमकार, श्री.वासुदेव ढोरे यांचे सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.