सदोष पद्धतीने ओबीसींचा डेटा गोळा करण्यास ओबीसी समाजाचा विरोध
खामगांव- दि.१७ | ओबीसी समाज खामगाव व महाराष्ट्र माळी कर्मचारी महासंघ खामगाव तसेच विविध ओबीसी संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांना ओबीसीच्या सदोष पद्धतीने इम्पीरियल डेटा गोळा करण्यास विरोध करण्यासाठी आज दिनांक 17 जुन रोजी निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केले नुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे सदर आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती परंतु आमचे असे निदर्शनास आले आहे की आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअर द्वारे आड नावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे करिता महोदयांना विनंती की समर्पित आयोगा द्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व बी एल ओ,तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासना मार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा ओबीसी समाजाच्याच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्याची परिणामाची जबाबदारी सर्वस्व प्रमुख म्हणून आपलीच राहील यासाठी हे निवेदन देण्यात येते कृपया दखल घ्यावी ही विनंती.असे नमूद केले आहे.
निवेदनावर ओबीसी कार्यकर्ते तथा महाराष्ट्र माळी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र वानखडे, पत्रकार योगेश हजारे, सुनील पारखेडे, संतोष निलखन, जयेश वावगे उपसरपंच सुटाळा, डॉक्टर श्याम देवकर, मनोज सुळोकार सरपंच जनुना, गणेश राऊत, सुरेश राऊत, श्रीधर बोदडे इत्यादी ओबीसी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.