आपला जिल्हा

महापुरुषांचे विचार जयंती आणि पुण्यतिथी पुरते मर्यादित ठेवू नका- महेश दारुंटे

अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर या संघटनेचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक होण्या संदर्भात प्रशासकीय कार्यालया मध्ये निवेदने

श्रीरामपूर- दि. १५ | आपल्या भारत देशामध्ये अनेक महान अशा महिलांनी जन्म घेतला ज्यांनी आपल्या महान कार्याने आपले नाव इतिहासाच्या पानावर कोरले आणि समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण केला त्यांचे कार्य विसरणे अशक्य आहे.

ज्यांनी समाजाला एक नवी दिशा दिली. जुन्या चालीरीती झुगारून युवावर्गाला एक नवी दिशा दिली. सावित्रीबाई फुले थोर समाजसेवक समाज सुधारक व महान शिक्षण प्रसारक होत्या ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजाचा विरोध डावलून समाजाकडे लक्ष न देता स्त्री शिक्षणाचा पाया फुले दाम्पत्यांनी भिडे वाडा येथे सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य पाहता त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून श्रीरामपूर येथे रामराव अधिक चौकामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका, तहसीलदार साहेब उपविभागीय अधिकारी यांना अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर यांच्या वतीने हे निवेदने देण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ गुलदगड, राज्य सचिव सुनील भाऊ गुलदगड, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भाऊ महाजन, उत्तर जिल्हा अध्यक्ष मुकुंद मामा काळे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ तुपे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष महेश दारुंटे, शहर संपर्क प्रमुख महेश सोनवणे, पत्रकार भाऊसाहेब जाधव, आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड, बिपिन म्हसे, अमोल सिन्नरकर, गणेश डंगारे, अक्षय अभंग, मयूर विधाटे, दत्तात्रय लोखंडे, बजरंग पटारे, कृष्णा गायकवाड, अभिजीत चव्हाण आदी फुले प्रेमी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button