मांडका येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
मांडका, ता. खामगाव, दि- 01| दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्राम मांडका येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 397 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम अहिल्यादेवीच्या घोड्यावर स्वार प्रतिमेला गावातील प्रतिष्ठित श्रीकृष्ण पाचपोर, माधव खंडारे, अनिल क्षिरसागर, विनोद लोड, रामदास मोरखडे, मुरलीधर क्षिरसागर, नरेश वानखडे यांनी पुष्पहार अर्पण करत पूजन केले. त्यानंतर गावातून दिंडी-भजनासह मिरवणूक काढून गावातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आल्या.
शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान पाचपोर यांनी केले. त्यावेळी क्रांतीसूर्य न्यूजचे प्रविण बोचरे यांनी अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, ते म्हणाले की आहिल्यामाईला आपण हाती पिंड देऊन एका धार्मिक चौकटीत बंद केले, परंतु अहील्यामाईचे कार्य याही पेक्षा अफाट आहे, आम्हाला इंग्रजांशी लढणारी झांसीची राणी दाखवल्या गेली पण ज्या बहुजन रणरागिणीने हाती तलवार घेऊन प्रत्यक्ष अनेक युद्ध, लढाया केल्या त्यांना दाखविल्या गेल्या नाहीत, म्हणून त्यांना धार्मिक चौकटीतून बाहेर काढून अशा मराठी अस्मितेच्या रणरागिणीचा खरा इतिहास आपण अभ्यासाला पाहिजे.
कार्यक्रमाचे संचालन संतोष बोचरे यांनी केले तर आत्माराम पाचपोर यांनी समायोचित भाषण करून अहिल्यादेवी च्या कार्याला उजाळा दिला. मराठी अस्मिता टिकवून ठेवणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर त्यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार सेना यांनी केले होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामदास साबे, राजू पाचपोर, गणेश पाचपोर, बळीराम दिवनाले, विठ्ठल जुमळे, प्रमोद पाचपोर, विष्णू जुमळे, योगेश पाचपोर, प्रतिक पाचपोर, श्रीकृष्ण करांगले, परशुराम क्षिरसागर, श्रीधर क्षिरसागर, अनिल दिवनाले, संदीप पाचपोर, निलेश पाचपोर, वैभव पाचपोर, कवी गायक रामेश्वर खंडारे, हरिहर भिसे यांनी मेहनत घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी मोठ्या उपस्थित होत्या. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आत्माराम पाचपोर यांनी केले.