तळेगांव ढमढेरे येथे शनिवारी माळी समाजाची बैठक
महाराष्ट्र राज्य माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शनिवार दि.४/६/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता तळेगाव ढमढेरे येथे जेष्ठ नेते मुरलीधर (नाना) भुजबळ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी माळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज कार्य करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या बैठकीत माळी समाजातील तळेगाव ढमढेरे येथील नंदाताई भुजबळ यांची महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.त्याबरोबरच बैठकीत ओबीसी आरक्षण, पुणे येथील भिडे वाड्याच्या प्रलंबित विषयवार चर्चा व माळी समाज्यावरती राजकीय क्षेत्रात होणा-या कुरघोड्या वरती चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीला मुंबई हाय कोर्ट चे ॲड.नितीनजी राजगुरू, नानासाहेब ननवरे ,महेश भाऊ गोरे, मुरलीधर भुजबळ, रूपाली ताई रायकर, बापूसाहेब बोराटे, संजय जकाते, ज्ञानदेव शिंदे, राजेंद्र गोरे,भारतीताई आल्हाट,प्रितम खेरडे, धनंजय जाधव, नंदाताई भुजबळ, गणेश गायकवाड, स्वप्नाताई लोणकर,मनोज गुंजाळ, वर्षाताई भोंग, प्रमीलाताई चवरे, वैशाली सिनलकर, सीमाताई पांढरे, सुनिल जाधव, अतुल ननवरे, बाळासाहेब झगडे,उमेश गायकवाड, सुनिल बनसोडे,लक्ष्मण शिंदे,किरण वाघ, महादेव शिंदे, अनिकेत अदलिंगे,संतोष कोरपडे, बापू गवळी, गणेश म्हेत्रे, प्रदिप देवकर, कमलाकर फुले,मसुराज राऊत, दशरथ राऊत,पोपट गायकवाड महेश बनकर,तेजस हेगडे, संदीप बारवकर,किरण बोराटे, प्रदिप शिंदे, दिपक शिंदे, महेश शिंदे,हरिदास राऊत, संतोष झुरंगे,सचिन व्यवहारे, याबरोबरच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.