आपला जिल्हा

जि प आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे एक् मे उत्साहात साजरा

कळंब तारीख 1 . तालुक्यातील मौजे माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळंब चे विस्ताराधिकारी माननीय श्री संभाजीराव जगदाळे साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजय व्यंकटराव शिंदे, गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री विलासरावजी मोहिते, उपसरपंच श्री शरद राव गालट, अंगणवाडी सेविका श्रीमती सोनवणे ताई शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष भोजने, सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे,शिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी, श्रीमती समीना बागवान यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

यावेळी जि प प्राथमिक शाळेचा सन 2021- 22 चा वार्षिक निकाल वाचून दाखवण्यात आला. व विद्यार्थ्यांना गुण पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी माननीय विस्ताराधिकारी श्री जगदाळे साहेब यांनी उपस्थित पालकांना संबोधित करताना इंग्रजी शाळेपेक्षा आपल्या जीपच्या शाळा कित्येक पटीने सरस असल्याचे सांगितले. या शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करावे असेही सांगितले. शाळा तालुका व जिल्ह्यामध्ये स्वच्छ शाळा उपक्रमात सहभागी झाली असून शाळेने राबवलेले विविध उपक्रम, स्वच्छतेच्या सवयी, भौतिक साधने यांची सविस्तर तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button