माळी समाजातर्फे डॉक्टर सदानंद धनोकार यांचा सत्कार संपन्न
खामगाव – दि. 06| विदर्भातील प्रतिष्ठित अशा कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव चे मुख्य प्रशासक म्हणून माळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था पळशी बु चे सर्वेसर्वा डॉ श्री सदानंदजी धनोकार यांनी पदभार स्वीकारला.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशा नुसार त्यांनी काल दिनांक 5 मे 2022 ला मुख्य प्रशासकाचा पदभार स्वीकारला त्या अनुषंगाने माळी सेवा मंडळ खामगाव, युवा माळी सेवा समाज मंडळ खामगाव, माळी युवक संघटना सुटाळा बु या सर्वांच्या वतीने सिव्हिल लाईन स्थित डॉ श्री सदानंद धनोकार यांच्या निवासस्थानी एका छोट्याशा समारंभामध्ये समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला,
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी श्री प्रल्हाद भाऊ बगाडे हे होते, तर प्रमुख उपस्थिती मध्ये राजेश धनोकार, गट नेते, नगर परिषद खामगाव, प्रल्हादभाऊ सातव, माजी अध्यक्ष परिचय संमेलन शेगाव, विजय वावगे, अध्यक्ष परिचय संमेलन, विठ्ठल भाऊ धनोकार, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री नावकर साहेब, चंद्रकांत वाढोकर, उपाध्यक्ष हे होते, या सत्काराच्या प्रसंगी समाजातील लहानथोर मंडळींनी डॉ सदानंद धनोकार यांना भेटून पुष्पगुच्छ, हार देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्यांच्या हातून अशीच समाज सेवा घडो आणि ते निरंतर प्रगती करो अशी सदिच्छा श्री प्रल्हादभाऊ बगाडे यांनी अध्यक्ष पदावरून बोलतांना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल चे प्रदेश सचिव श्री अजय तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन माळी सेवा मंडळ खामगाव चे सचिव प्रदीप सातव यांनी व आभार प्रदर्शन युवा माळी सेना समाज मंडळाचे सचिव अशोक चिंचोळकर सर यांनी केले सर्वात शेवटी डॉ धनोकार यांनी सत्काराला उत्तर देऊन सर्वांचे सर्वांना धन्यवाद दिले व कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी, माळी सेवा मंडळाचे श्री विकास बगाडे, जयेश वावगे, गणेश खिरोडकर, दत्ता जवळकर, संतोष निलखन, प्रवीण माळी, दयाराम वानखडे, युवा माळी समाज सेवा मंडळाचे , श्री संदीप सोनटक्के, जगदीश लोखंडे, शैलेश धानोकार, प्रमोद मसने, सुमंता लोखंडे, देवेंद्र पल्हाडे, गजेंद्र लहाने, प्रकाश चिंचोळकर, गोविंदराव ची चिंचोळकर, प्रकाश हाडोळे, हरिदास धनोकार, संतोष चिंचोळकर, हेमंत लोखंडे, निलेश पल्हाडे,तर माळी युवक संघटनेचे श्री केशव इंगळे, अध्यक्ष, महादेव दबडघाव,सदस्य ग्रा पं सुटाळा बु, सुदाम इंगळे, मंगेश वानखडे, मारोती इंगळे, आकाश वानखडे, निलेश वावगे,शुभम बोदडे , ज्ञानेश्वर भोपळे, गोपाल सातव, सोम बोराखडे, यांची उपस्थिती होती