डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामुहिक संविधान वाचन
पुणे- दि.14 | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व यंग पृथ्वी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामुहिक संविधान वाचन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध मान्यवरांच्या हस्ते वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन यंग पृथ्वी फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. सपनाताई माळी शिवणकर व अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे शहर कार्याध्यक्षा सौ. गौरीताई पिंगळे यांनी केले. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या महिला सौ. प्रदेशाध्यक्षा मंजिरीताई धाडगे यांची उपस्थिती लाभली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणामय वातावरणात अभिवादन करण्यात आले. यावेळी कोथरूड मतदार संघाचे आमदार श्री. चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष श्री. प्रशांतदादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार कमलनानी ढोले पाटील यांनी केले.
यावेळी निलमताई गोरे, चंदाताई केदारी, किरण बेनकर, माऊली राडकर, भूषण बधे, प्रितेश गवळी, पंढरीनाथ बनकर इ मोठ्या संख्येने समता सैनिक उपस्थित होते. सौ. सपनाताई माळी शिवणकर व सौ. गौरीताई पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.