महात्मा फुले जयंती निमित्य शिव-फुले-शाहू-आंबेडकर शाहिरी जलसा संपन्न
मांडका ता. खामगाव दि.11| ग्राम मांडका येथे 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये शाहीर डी आर इंगळे बुलढाणा व त्यांचा संच यांचा समाज प्रबोधन पर कार्यक्रम संध्याकाळी ठीक आठ वाजता सुरू झाला. तत्पूर्वी गावातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद बगाडे, सचिव प्रदीप सातव, खरेदी-विक्री संघाचे संचालक पांडुरंग राखोडे, खरेदी-विक्री संघाचे संचालिका प्रमिला वानखडे, शेगाव माळी समाज परिचय संमेलन अध्यक्ष विजय वावगे, साप्ताहिक समाजनिष्ठा च्या कु. मोनाली वानखडे, गजानन राऊत, उल्हास क्षिरसागर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच रमेश खंडारे हे होते.
सदर कार्यक्रमांमध्ये शिव- फुले-शाहू -आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर शाहिरी गीते सादर करून समाज प्रबोधन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत आयोजन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु. प्रतिक्षा क्षिरसागर हिने केले, तर प्रास्ताविक प्रविण बोचरे यांनी केले. सदर कार्यक्रम हा क्रांतीसूर्य न्यूज वर लाईव्ह करण्यात आला.
कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिला, पुरुष, युवक मंडळीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष अनंता खंडारे, उपाध्यक्ष शत्रुघ्न बोचरे, सचिव राहुल क्षिरसागर, तर सदस्य पुरुषोत्तम बोचरे, गोपाळ अत्तरकार, रवी धनोकार, अक्षय खंडारे, सागर बोचरे, सतिश क्षिसागर, प्रशांत खंडारे, नंदू शिरसागर, यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक गावातील प्रतिष्ठित जगन्नाथ खंडारे, विनोद भाऊ लोड, महादेव खंडारे, विलास क्षिरसागर, जयराम बोचरे, अनिल क्षिरसागर हे होते शेवटी संध्याकाळी रात्री दहा वाजता समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, कलाकार संच, पि राजा स्टेशनचे पोलीस कर्मचारी, गावचे पोलीस पाटील, व उपस्थित सर्व यांचे आभार समितीचे मार्गदर्शक संतोष बोचरे यांनी केले.