आपला जिल्हामहाराष्ट्र

महात्मा फुलेंचे कार्य शेतकर्यांना प्रेरणादायी- प्रमोद रसाळ

राहुरी/नगर- दि. 11| महात्मा फुले कृषी विद्यापीठ-श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे सालाबाद प्रमाणे “महात्मा फुले यांची १९५ वी जयंती” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ विद्याशाखेचे विभागप्रमुख श्री रसाळ साहेब, श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भुषन सचिन भाऊसाहेब गुलदगड समवेत राज्यसचिव सुनिल गुलदगड, सौ.उमाताई मेहेत्रे, युवा उद्योजक स्वप्निल भास्कर, श्री गाडगे महाराज आश्रम शाळेचे मा. मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी सर, वळव शाखेचे मुख्याध्यापक मंगेश पगारे सर, प्रा. धिवर, प्रा. महाविरसिंह चौहान, मनोज मेहेत्रे, देवीदास शेंडे, अक्षय मैहेत्रे, अमोल वाकचौरे, सुरक्षा अधिकारी शेटे साहेब, अमोल पुजारी, गोरख पुंड, जगदिश धिवर , श्रिपत तरटे ,आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मा.रसाळसाहेब बोलताना म्हनाले कि “महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य सर्व जगाला सर्वश्रुत असुन शतकर्यांना प्रेरणादायी असे कार्य आहे. शेतकर्यांप्रती जे आपण काम करतो तेच खरं जर आपण प्रामाणिकपणे केले तर तीच खरी महात्मा फुलेंना आदरांजली ठरेल.

यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड, उमाताई मेहेत्रे, जगन्नाथ सुर्यवंशी सर, पगारे सर यांनी भाषणातून महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली. यावेळी श्री संत सावता माळी युवक संघाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते,कार्यक्रमास उपस्थितांचे आभार संघाचे राज्यसचिव सुनिलभाऊ गुलदगड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button