आपला जिल्हा

महात्मा फुले जयंती डिजे टाळून प्रबोधनपर कार्यक्रमातून होणार साजरी- मांडका येथील युवकांचा क्रांतिकारी निर्णय

माळी सेवा मंडळ खामगाव अंतर्गत माळी युवा संघटन शाखा मांडका कार्यकारिणीची निवड

मांडका/बुलडाणा-दि. 27  | क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अलिकडेच महापुरुषांच्या जयंतीला हजारो रुपये खर्च करून आधुनिक डीजे लावण्यात येतात. त्यामध्ये हजारो रुपयांचा खर्च करून काहीही साध्य होत नाही. परंतु या गोष्टींना फाटा देऊन मांडका तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील युवकांनी क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. 11 एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीला डीजे न लावता त्याच पैशातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

सविस्तर असे की कोरोणामुळे मागील दोन वर्षापासून महात्मा फुले यांची जयंती सार्वजनिक रित्या साजरी केली गेली नाही. मात्र या वर्षीची स्थिती पाहता, जयंती मोठ्या उत्साहात साजरी होण्याचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. खामगाव तालुक्यातील मांडका येथेही यावर्षीची महात्मा फुले जयंतीची नियोजन बैठक रविवार दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी महात्मा फुले पुतळा येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक सुगदेव खंडारे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच रमेश खंडारे त्याचप्रमाणे जगन्नाथ खंडारे, राघव वावगे, माधव खंडारे, संतोष बोचरे, केशव खंडारे, जयराम बोचरे, वामन खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीमध्ये सर्वप्रथम या वर्षी महात्मा फुले यांची जयंती उत्सव साजरी करण्याचे ठरले. त्याचप्रमाणे डीजे ला पैसे खर्च न करता त्याच पैशातून सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करणे व महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

माळी सेवा मंडळ खामगाव अंतर्गत माळी युवा संघटन शाखा मांडका कार्यकारिणीची निवड
याच कार्यक्रमात माळी सेवा मंडळ खामगाव चे अध्यक्ष प्रल्हादभाऊ बगाडे, सचिव प्रदीप सातव सर, युवा नेतृत्व योगेशभाऊ हजारे, जयेशभाऊ वावगे, दत्ताभाऊ जावळकर, उल्हासभाऊ क्षिरसागर यांच्या सूचनेनुसार मांडका येथील युवकांची माळी युवा संघटन ग्राम शाखा निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष-अनंता खंडारे, उपाध्यक्ष- शत्रुघ्न बोचरे, सचिव- राहुल क्षिरसागर, सदस्य म्हणून- गोपाल अत्तरकार, नंदू क्षिरसागर, पुरुषोत्तम बोचरे, प्रशांत वामन खंडारे, रवींद्र धनोकार, सागर बोचरे, सतिष क्षिरसागर, अक्षय खंडारे यांचा सहभाग आहे.

या कार्यकारिणीच्या माध्यमातून पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले
१) समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मार्गदर्शन करणारे करियर गार्डन्स कार्यक्रम राबवणे.
२) येणाऱ्या 2025 पर्यंत समाजातील कमीतककार्यक्रमातूनमी 10 युवकांना शासकीय किंवा प्रायव्हेट नोकरी मिळवून देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व मदत करणे.
३) शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे कार्यक्रम, मेळावे, कार्यशाळा आयोजित करणे.
४) महिला मेळावे, प्रबोधन कार्यक्रम आयोजित करणे.
५) रोग निदान शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे.
६) विविध महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करणे.
इ. विषयावर वर्षं काम करण्याचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीची रूपरेषा संतोष बोचरे यांनी तर एकूणच माळी युवा संघटनेच्या माध्यमातून करावयाच्या कार्याची रूपरेषा प्रविण बोचरे यांनी मांडली. शेवटी अनंता क्षिरसागर यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून बैठकीसाठी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीसाठी पुरुषोत्तम बोचरे, अनंता खंडारे, गोपाल अत्तरकार, अजय बोचरे, प्रशांत वामन खंडारे, राहुल क्षिरसागर, शत्रुघ्न बोचरे, वैभव क्षिरसागर, रवीद्र धनोकार, सागर खंडारे, विनोद अत्तरकार, शुभम रमेश खंडारे, गोपाल क्षिरसागर, प्रशांत अशोक खंडारे, सतिष क्षिरसागर, सागर बोचरे, शुभम अभिमन्यू खंडारे, विशाल बोचरे, राहुल खंडारे, प्रणव बोचरे, आकाश खंडारे, अक्षय खंडारे, प्रफुल बोचरे, तेजस खंडारे, राम बोदडे, आशीर्वाद खंडारे यांनी सहकार्य करीत उपस्थिती दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button