आपला जिल्हा

महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती च्या अध्यक्ष पदी कैलास भाऊ बगाडे

खामगाव- दि. 27 | माळी सेवा मंडळ खामगाव द्वारा आयोजित महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव खामगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते, त्या करिता यावर्षी आज रविवार ला माळी भवन येथे जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली त्यात सर्वानुमते ग्राम अंत्रज येथील उपसरपंच श्री कैलास बगाडे यांची उत्सव समिती च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,

तसेच सचिव श्री पंकज सातव, कोषाध्यक्ष -गणेश खिरोडकर, उपाध्यक्ष- उल्हास क्षिरसागर, अनंत सातव, दयाराम वानखडे, प्रचार प्रमुख -जयेश वावगे, रॅली नियंत्रक- दत्ता जवळकर, गजानन उटाळे, अभिषेक निखाडे, प्रसिद्धी प्रमुख – योगेश हजारे, प्रवीण बोचरे, सहसचिव- डॉ अनंत डवंगे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निमित्ताने झालेल्या सभेचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बगाडे हे होते तर सभेसाठी विजय भाऊ, वावगे, शंकरराव वानखडे, सदानंद खंडारे, रघुनाथ चोपडे, राजेंद्र बोचरे, रामभाऊ बोचरे, प्रदीप सातव, संजय तायडे, विनायक जुमळे, राजेंद्र भोपळे, यांची उपस्थिती होती, सभेचे संचालन प्रदीप सातव यांनी केले तर आभार विनायक जुमळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button