आपला जिल्हा

उस्मानाबाद जि प समोरील लाक्षणिक धरणे आंदोलनास बहुसंख्येने उपस्थित राहा. संतोष भोजने

कळंब/उस्मानाबाद- दि.26 | 30 मार्च 2022 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद उस्मानाबाद समोरील धरणे आंदोलनासाठी जिल्हाभरातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री संतोष भोजने राज्य उपाधक्ष सुखदेव भालेकर, मराठवाडा कार्याध्यक्ष सुहास दराडे, दिपक हजारे, विशाल जाधव, परमेश्वर साखरे, बालाजी माळी, सखाराम शिंदे, बाळासाहेब कांबळे, तानाजी तरंगे, रहिम तांबोळी, अशोक शिंपले, मच्छिंद्र बोकडे यांनी केले आहे.

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी येत्या बुधवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत जि प समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये जीपच्या शिक्षकांचे विविध प्रश्न मांडण्यात येणार आहेत. यामध्ये खालील प्रश्नांचा समावेश आहे.
1) जिल्हा परिषदेतील विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश तात्काळ काढावेत.
2) सांगली पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा अथवा ती रक्कम शिक्षक कल्याण निधी तात्काळ वर्ग करावी
3) वैद्यकीय प्रलंबित देयके गेल्या दोन वर्षापासून ची मंजूर करावीत. पुरवणी देयकांसाठी तात्काळ निधी द्यावा.
4) आकस्मिक मृत्युमुखी पडलेल्या डीसीपीएस बांधवांना तात्काळ सानुग्रह अनुदान मंजूर करावे.
5) आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षक बांधवांची सेवा जेष्ठता यादी तात्काळ जाहीर करावी
6) पदवीधर पदोन्नतीस नकार कळवलेल्या शिक्षक बांधवांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून पदावनत करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button