वैचारीक लेख

भारतातील प्रत्येक तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणा दायी क्रांतिकारक म्हणजे शहीद भगत सिंग – सुखदेव आणि राजगुरू – परमेश्वर बनकर

इंग्रजांच्या हातून भारतातल्या मूठभर लोकांच्या हातात देशाची सत्ता सूत्र येणे याला मी स्वातंत्र्य मानत नाही.हा भगत सिंगचा क्रांतिकारी विचार होता, हे विचार म्हणजे भल्या मोठ्या माणसाचे नव्हे तर 20 ते 22 वर्षाच्या भगत सिंगचे होते. स्वातंत्र्या बरोबरच इथल्या शेतकरी कष्टकरी कामगार यांची सर्व प्रकारच्या शोषणातुन मुक्तता व्हावी आणि देशाच्या सत्ताकारणात शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा ही सहभाग असावा किंबहुना देशाची सत्ताच या वर्गाच्या हातात असावी हा भगत सिंगचा विचार होता.

क्रांती म्हणजे केवळ रक्तरंजित युद्ध नव्हे तर क्रांती म्हणजे सध्यस्थित अन्यायावर आधारित असलेली समाज व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करून न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणे म्हणजे भगत सिंगच्या दृष्टीने क्रांती होय.आजच्या सारखे मोबाईल किंवा आधुनिक माध्यम नसताना देखील देशभरातील क्रांतिकारकांना एकत्रित करणे आणि तेही इंग्रजाना कळू न देता ही त्या काळात सोपी गोष्ट नव्हती तरीही देशभरातील क्रांतिकारकांना एकत्र करून त्यांची संघटना निर्माण करण्याचं काम 23 वर्षाच्या भगत सिंग ने केलं होतं.

आज सर्व माध्यम असताना देखील अन्यायाच्या विरोधात एकत्र येण्याचं काम 20 वर्षाचे तरुण करतील काय? जगभरातील क्रांत्यांचा विचार केला तर जवळपास सर्वच क्रांत्या तरुणांनी केलेल्या आहेत. त्याचा आदर्श घेऊन आजचे तरुण खाजगीकरण, भांडवलशाही, बेरोजगारी, महागाई, या विरोधात लढा देतील काय? नौकऱ्या, शिक्षण, हॉस्पिटल या साठी सरकार विरुद्ध भांडतील काय? केवळ भगत सिंगला शहीद दिवशी अभिवादन करणे भगतसिंगला अपेक्षित नव्हते तर भगत सिंगने दाखवलेल्या मार्गानुसार देशात क्रांती घडवून आणणे हे भगत सिंगला अपेक्षित होते.

23 वर्षाच्या भगत सिंगने कोट्यावधी तरुणांना दिलेला लाख मोलाचा संदेश म्हणजे. जे सरकार लोकांना त्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवत असेल तर असे सरकार उलथून टाकण्याची जिम्मेदारी ही तरुणांची आहे. ही जिम्मेदारी आजचे तरुण घेतील काय? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होतात. आज अनेक विचारवंतांना मारलं जात आहे. परंतु भगत सिंग म्हणाला होता व्यक्तीला मारून त्याचे विचार संपवता येत नाहीत.20 – 22 व्या वर्षी एवढी वैचारिक प्रगल्भता आत्मसात करून विषमते विरुद्ध लढणारा भगत सिंग सारखा दुसरा तरुण आपल्याला सांगता येणार नाही. अश्या या महान क्रांतीकारकाला शहीद दिवशी विनम्र अभिवादन.प[author title=”परमेश्वर बनकर, बीड” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/03/IMG-20220215-WA0054.jpg”]+919503288282, व्याख्याता, विचारवंत, लेखक[/author]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button