आपला जिल्हा

जि प आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा च्या शाळेत स्वयंशासन दिन व विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप

कळंब-दि.15 | गेली सात वर्ष ज्या शाळेमध्ये नियमित रूपाने अध्ययन करत होते अशा इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतील इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थी व गुरुजनांनी भावपूर्ण निरोप दिला.आज दिनांक 15 मार्च दोन हजार बावीस रोजी इयत्ता सातवी तील सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन अर्थात स्कूल डे शाळेमध्ये साजरा केला.

अगदी सकाळच्या शालेय परिसर स्वच्छते पासून ते परिपाठ आणि वर्गावरील अध्यापन यामध्ये सातवीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी उत्स्फूर्त सहभागी होत दिवसभर अध्ययन-अध्यापन केले. दुपारी शालेय मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना दिला आणि तो क्षण येऊन ठेपला. दुपारी ठीक तीन वाजता विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. गेली सात वर्ष ज्या शाळेने आपली जडणघडण केली तिच्याबद्दल त्या शाळेत अध्यापन करत असलेल्या शिक्षकाबद्दल अगदी अपार करुणा आणि कृतज्ञतेने ओतप्रोत भरून विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केल्या.

हाताच्या बोटाला धरून गिरविलेले धडे सांगतच सायन्स मधील वेगवेगळे प्रयोग करण्याचं कौशल्य कसे शिकवलं याबद्दल सर्व गुरुजनांचे आभार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. आजच्या दिवसाचा मुख्याध्यापक पदाचा पदभार चिरंजीव शिवम सचिन मोरे यांनी सांभाळला. त्याला वर्गातील ओम जाधव, सार्थक कुलकर्णी, संस्कार घाडगे, वैभव शितोळे, तसेच वैष्णवी पुदंगे,शिवानी मुळे श्रेया बारबोले, जान्हवी वटाणे, वैष्णवी कवडे, श्वेता रसाळ या सर्वांनी मोलाची साथ दिली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व मुलांना आज इंग्रजी व्याकरण व डिक्शनरी सप्रेम भेट देण्यात आली.

या सर्व कार्यक्रमासाठी शाळेतील सहशिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी, समीना बागवान सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे आणि मुख्याध्यापक श्री संतोष भोजने यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button