आपला जिल्हा

ओबिसींच्या हक्कासाठी एकजुटिने लढा द्या-नाना पटोले

शेगाव- दि.14 | दिनांक १२ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. आमदार नानाभाऊ पटोले यांनी दि.२८ मार्च ला होणाऱ्या O.B.C. सामाजिक मेळाव्याच्या नियोजन संदर्भात काँग्रेस पक्ष नेते ज्ञानेश्वरदादा पाटिल यांचे माऊली इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे आढावा बैढक आयोजीत केली होती.

केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधी धोरणामुळे ओबिसी आरक्षण धोक्यात आले आहे , स्थानिक स्वराज्य संस्थे सोबतच, शिक्षण व नोकरीतील ओबिसी आरक्षण वाचवायच असेल तर सर्वांनी एकजुटिने लढल पाहीजे , त्या करीताच सर्व ओबिसींना एकत्र करून ओबिसी चळवळ अधिक गतीमान करण्यासाठी ओबिसी मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे सांगितले . व सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचेआवाहन कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी केले.

या कार्यक्रमाला छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भुपेशजी बघेल व हार्दीक पटेल ऊपस्थीत राहणार असल्याची माहिती नानसाहेब पटोले यांनी दिली आहे .

यावेळी आमदार राजेश एकडे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे , प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, प्रदेश सचिव तथा ज. वि. पक्षनेत्या डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, प्रदेश सचिव ॲड. सौ. जयश्रीताई शेळके, जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे , जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटिल, काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटिल , प्रदेश सचिव धनंजय देशमुख, जि. प. अध्यक्षा सौ. मनिषा पवार, प्रदेश सचिव दादूशेठ, मा. जि. प. अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील,

प्रदेश काँग्रेस ओबिसी विभाग सचिव अजय तायडे, काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण, महीला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मंगलाताई पाटिल, ज्योतीताई ढोकणे, मेहकर नगराध्यक्ष कासमभाई गवळी  शहर काँग्रेस अध्यक्ष किरणबाप्पु देशमुख , जिल्हा उपाध्यक्ष कैलासबाप्पु देशमुख, जयंतराव खेळकर, सोशल मीडिया राज्य समन्वयक श्लोकानंद डांगे, सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पटोकार, जळगाव जा तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर, मंगेश भारसाकळे यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय तायडे यांनी केले तर प्रास्ताविक मंगेश भारसाकळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button