धरणगाव येथील माळी समाजाच्या वतीने सत्यशोधक विधिकर्ते प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
सत्यशोधक भिमराव कोथिंबिरे लिखित " सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टक सर्व पूजाविधि " पुस्तकाचे प्रकाशन
धरणगांव – दि.13 | धरणगाव येथे सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्या वतीने सत्यशोधक विधिकर्ते प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सल्लागार पंच हेमंत माळी सर यांनी केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य डी.जी.पाटील होते. उद्घाटक म्हणून शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा माळीसमाज सल्लागार पंच गुलाबरावजी वाघ, माळी समाज अध्यक्ष विठोबा महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, सचिव गोपाल माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, सहसचिव डिगंबर महाजन, तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष निलेश चौधरी, लहान माळीवाडा अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, बी.एन.चौधरी,
माळी समाजाचे विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, विजय धनलाल महाजन, सी.के.पाटील, पाटील समाज अध्यक्ष भीमराज पाटील, राष्ट्रीय चर्मकार संघ कार्याध्यक्ष भानुदास विसावे, तिळवण तेली समाज अध्यक्ष सुनील चौधरी, मराठे समाज अध्यक्ष दिलीप मराठे, बडगुजर समाज अध्यक्ष वासुदेव बडगुजर, धानोरा चे सरपंच भगवान महाजन, तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष एड.व्ही.एस. भोलाणे, माळी समाज विश्वस्त संजय महाजन, कैलास माळी, बौद्ध समाज विश्वस्त दिपक वाघमारे, मोहन शिंदे, जालन्याचे प्रांताधिकारी भाऊसाहेब जाधव, शिवाजी गाडेकर, सूधाकर बडगुजर, विश्वासराव पाटील, कृष्णा मालकर, कैलास जाधव
जयवंतराव शिंदे या सर्व मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज , कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवराय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे महापुरुषांच्या जीवनावर आधारित अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तदनंतर सत्यशोधक सुरेश झाल्टे, प्रा.भरत शिरसाठ, डॉ. संजीवकुमार सोनवणे, भगवान महाजन यांनी सत्यशोधक चळवळ, आपली संस्कृती, व आपले विधी आपणच करावे असे प्रतिपादन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उद्घाटनपर भाषणात गुलाबरावजी वाघ यांनी या ऐतिहासिक सत्यशोधक प्रबोधन शिबिराचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत, माळी समाज व पंच मंडळाचे अतिशय अभिमानास्पद कार्याचे अभिनंदन केले.
मान्यवरांच्या हस्ते धरणगाव शहरात सत्यशोधक विवाह केलेले सत्यशोधक संजय महाजन व आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डी.जी.पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येक समाजात विधीकर्ते निर्माण झाले पाहिजे असे प्रतिपादन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रबोधन शिबिराला औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर येथून प्रशिक्षणार्थी आले होते. दिवसभर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षक सत्यशोधक विधीकर्ते भीमराव कोथिंबिरे, भगवान रोकडे, राजकिशोर तायडे, अरविंद खैरनार यांनी मार्गदर्शन केले. आणि प्रात्यक्षिक स्वरूपात विधी करून दाखविले.
माळी समाजाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते सत्यशोधक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष अरविंदजी खैरनार यांना तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांचे पागोटे परिधान करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तद्नंतर सत्यशोधक विधिकर्ते भिमराव कोथिंबिरे लिखित ” सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टक सर्व पूजाविधि ” ह्या अनमोल ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव पाटील, पी.डी. पाटील यांनी तर आभार मनोज माळी यांनी केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व समस्त पंचमंडळ, सत्यशोधक विचार मंच चे कार्यकर्ते आबासाहेब राजेंद्र वाघ, गोरख देशमुख, गोपाल माळी, कैलास माळी, नितेश माळी, मनोज माळी, निवृत्ती माळी, समाधान महाजन व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.