सर्वोदय विद्यालय गोलटगाव येथील शाळेची इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावर निवड
औरंगाबाद- दि. 08 | सर्वोदय विद्यालय गोलटगाव ता.जि.औरंगाबाद या शाळेचा विद्यार्थी चि.आप्पासाहेब नाना कुबेर वर्ग आठवा याने राज्यस्तरावर इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी सादर केलेला प्रकल्प “सर्वोदय पेरणी यंत्र” या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.
सदर प्रदर्शन 24 फेब्रुवारी 2022 रोजी अॉनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले होते.नुकताच सदर स्पर्धेचा निकाल संचालक राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपुर यांच्या कडून कळविण्यात आला आहे.या स्पर्धेत राज्यस्तरावर संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण तीनशे आकरा प्रकल्प सहभागी झाले होते. त्यातून औरंगाबाद जिल्हयातून राष्ट्रीय स्तरावर सर्वोदय विद्यालय ही शाळा एकमेव ठरली आहे.
या प्रकल्पासाठी विज्ञान शिक्षक श्री संजय महाजन व श्री बाजीराव फावडे यांनी मार्गदर्शन केले होते.सदर प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून यामुळे श्रमाची व वेळेची बचत होईल असे प्रयोगामार्फत दाखवून देण्यात आले.त्याच बरोबर पर्यावरण संवर्धानात वृक्ष लागवडी साठी सुध्दा मदत होवू शकते .
या यशाबद्दल शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परीषद औरंगाबाद श्री मधुकर देशमुख , विभागीय मंडळ सहसचिव श्री यशवंत दाभाडे व सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक साळुंके, सचिव श्री शेखर साळुंके मुख्याध्यापक श्री विजय महाजन, पर्यवेक्षक श्री तात्याराव तागड, जि .प.के.प्र. राजेंद्र चव्हाण, सुभाष पाटील, बंकट मोरे, रविंद्र साळुंके, रविंद्र जाधव, आबासाहेब पाटील, भगवान जाधव,रमेश अहीरे, संतुकराव चव्हाण, विजय साळुंके, आनंद आरके, चिंतलवाड सर, आनंद देशमुख, वर्षा असोरे, संगिता नेहते, वृषाली बिरादार, पुष्पा बैलम , शितल पाटील, लक्ष्मण पाटेकर, आदी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.बबन शिंदे, प्रभाकर अंबिलढगे, जनार्दन पवार, भास्कर साळुंके, काशिबाई पवार, बळीराम ठोकळ, अभिजित दाणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .