माळकरंजा येथे जागतिक महिला दिन साजरा
नका करु आता कुणीही रेकी
कारण आम्ही आहोत सावित्रीच्या लेकी*
पंखात आता आमच्याही बळ
सिद्ध करण्याची आहे तळमळ
स्वतः शिकुणी तु आम्हाला केलं सुज्ञ,
आमच्या बरोबर देशही झाला प्रज्ञ
कळंब- दि. 8 | तालुक्यातील तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा आणि युनोस्को क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्वच मुलींनी उस्फुर्त सहभागी होऊन महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. भाषणातून, गीतातून, नकला मधून व पोवाड्या मधून अनेकविध महिला वरील अन्याय व अत्याचाराचे पदर उघडून उपस्थित सर्व महिला पालक सदस्यांसमोर कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमात यावेळी मंगरूळ येथील आरोग्य अधिकारी श्रीमती शितल दळवी, श्रीमती सत्वधर मॅडम यांनी उपस्थित महिला भगिनी व किशोरवयीन मुलींना येणाऱ्या विविध समस्या अडी-अडचणी यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी यांनी कष्ट घेतले. यावेळी कार्यक्रमात विविध प्रकारचे पोवाडे, गाणी,भाषणे घेण्यात आली. उपस्थितांनी सर्व कार्यक्रमास अतिशय छान प्रतिसाद दिला. यावेळी श्रीमती किर्ती माने, सुनिता गुरव, वैशाली कवडे, राणी रसाळ, अश्विनी वटाणे यांच्यासह अनेक मातापालक भगिणी, शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष भोजने सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे यांच्यासह स्वयंसेविका श्रीमती वैष्णवी शिरसागर मॅडम व कुलकर्णी मॅडम उपस्थित होत्या.