आपला जिल्हा
श्रमिक एकता महासंघातर्फे महिला दिन संपन्न-
पुणे/रांजणगाव- दि. 05 | जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रमिक एकता महासंघाने रांजनगाव एमआयडीसि येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. परंतु 8 मार्चला सुटीचा दिवस नसल्याने सदर कार्यक्रम 3 मार्चला सुटीच्या दिवशी घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या रोहिनीताई रासकर ह्या होत्या, त्यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी श्रमिक एकता महासंघाच्या अध्यक्षा विद्याताई तांबे, कार्याध्यक्ष संतोष भुजबळ यांच्यासह रोहिणी नवले, शारदा भोसले, रोहित पवार, अरुण घुले, इ. श्रमिक महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.