अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याची आगेकूच- प्रा अण्णा माळी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ना. छगनरावजी भुजबळ साहेबांच्या अथक प्रयत्नातून हरी नरके साहेबांनी आजपर्यंत अनेक समाजहितपर व मानव कल्याणाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. “बहुजन हिताय बहुजन सुखाय” ह्या ध्येयानुरुप सूरु असलेल्या, यशाप्रत पोहोचलेल्या व मार्गस्थ असणाऱ्या अनेक उपक्रमातील एक महत्वपूर्ण कार्य म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सन्माननीय ना. उद्धवरावजी ठाकरे (मुख्यमंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली व सन्माननीय राज्यपाल महामहिम श्री. भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणारे अनावरण कार्य होय.
सन्माननीय ना. छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली हरी नरके सरांनी समता परिषदेच्या मागण्यांपैकी आजपर्यंत मंडल आयोग अंमलबजावणी, ओ बी. सी. विद्यार्थी शिष्यवृत्ती, विद्यापीठांचे नामविस्तार, ओ. बी. सी. आरक्षण, पुणे व नायगाव येथील म. फुले निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व क्रांतिज्योती सावित्रीबाई स्मारक यांचे राष्ट्रार्पण, महाज्योतीचे महत्कार्य इत्यादी महत्वपूर्ण असे बहुजनहितकारी निर्णय व अंमलबजावणी होऊन बहुजन समाजोन्नतीस हातभार लागला आहे.
भिडेवाड्याचेही राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करुन तेथे मुलींची शाळा सुरू करणे ह्या महत्वपूर्ण कार्यास देखिल ना. छगनरावजी भुजबळ साहेब व सन्मा. ना. अजितदादा पवार यांच्या प्रयत्नांनी चालना मिळाली आहे. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात होणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ही सन्माननीय ना. छगनरावजी भुजबळ साहेब आणि हरी नरके साहेब आणि अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या क्रांतिकारी कार्याचे पुढे पडलेले एक चिरंतन पाऊल होय.
माजी खासदार सन्मा. समिरभाऊ भुजबळ, माजी आमदार सन्मा. पंकजभाऊ भुजबळ, ओ. बी. सी. महामंडळाचे माजी अध्यक्ष सन्मा. श्री. बापूसाहेब भुजबळ ह्यांचेही सहकार्य अनमोल होय. क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा आदर्श समोर ठेवत बहुजन समाजबांधवांनी वाटचाल करावी हीच अपेक्षा.[author title=”प्रा अण्णा माळी ” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/02/IMG-20220215-WA0051-e1644937196697.jpg”]M. A._Eng. /Hin. /Mar. /B. Ed. मा. सरचिटणीस म. फुले समता परिषद जिल्हा धुळे, मा. संचालक म. फुले विद्या प्रसारक संस्था देवपूर, धुळे.[/author]