सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १४ फेब्रुवारीला अनावरण
मुंबई, नाशिक,दि.६ फेब्रुवारी | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अनावरण करण्यात येणार आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Moअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यातून व मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि.३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार होते.मात्र कोरोनाचा प्रभाव अधिक वाढल्याने सदरचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.हा पुतळा व परिसरातील सुशोभिकरण पूर्णत्वास आले असून सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.