मोरया प्रतिष्ठान तर्फे सीमा एकतपुरे व अश्विनी भानवसे यांचा सत्कार
माळशिरस/सोलापूर- दि. 06 | मोरया प्रतिष्ठान वेळापुर मालशिरस सोलापुर राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ सीमाताई विजय एकतपुरे तर सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ अश्विनी भानवसे यांची निवड झाल्याबद्दल मोरया प्रतिष्ठान च्या वतीने सौ अश्विनी रामचंद्र ताटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित महीलांना नाशिक येथील मराठी साहीत्य संमेलनाचे आदरनिय भुजबळ साहेब यांच्या भाषणाची प्रत सौ सीमाताई एकतपुरे यांनी सत्कार प्रंसगी उपस्थित महीलानां वाटप करताना त्या म्हणाल्या की यापुढे पक्षाच्या तसेच समता परीषद च्या माध्यमातून सर्व घटकातील महीलानां न्याय देण्यासाठी तत्परतेने कार्य करीत राहील तसेच प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र महीला आयोगाच्या अध्याक्षा सौ रुपालीताई चाकणकर दिपालीताई पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त महीलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध रहील. यावेळी सौ सुरेखा संतोष म्हेत्रे सौ.कोमल निलेश म्हेत्रे सौ पुजा सागर म्हेत्रे सौ राजश्री विठ्ठल म्हेत्रे अश्विनी भानवसे आदी उपस्थित होते