संजय गांधी निराधार योजनेच्या पहिल्याच सभेत 597 प्रकरणे निकाली
खामगाव- दि.01 | सोमवार 31 जानेवारीला तहसील कार्यालय खामगाव येथे पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजना तालुका समितीच्या पहिल्या सभेत 597 प्रकरणांना मंजुरी देऊन निकाली काढण्यात आले.
तहसील कार्यालय खामगाव येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा, अपंग, राष्ट्रीय कुटुंब योजना संदर्भात अनुदान प्राप्त करण्यासाठी केलेल्या अर्जांची अंतीम मंजुरात घेण्याकरिता ही सभा घेण्यात आली. या सभेमध्ये राष्ट्रीय कुटुंब योजना 50 प्रकरण, श्रावण बाळ योजना 183 प्रकरण, संजय गांधी निराधार योजना 341 प्रकरण, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना 23 प्रकरणे अशी एकूण 597 प्रकरणांना मंजुरात देण्यात आली.
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यानंतर मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या संजय गांधी निराधार योजना समिती ही महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरिता जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी स्थापन केली आणि या समितीने पहिल्याच मीटिंगमध्ये 597 प्रकरणांना मंजुरात दिली तसेच येणाऱ्या काळात लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येईल यासाठी समिती प्रयत्नशील राहील.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे खामगाव तालुका अध्यक्ष किशोर आप्पा भोसले हे होते तसेच तहसीलदार अतुल पाटोळे साहेब, नायब तहसीलदार नेमाने मॅडम, समितीचे सदस्य प्रीतम माळवंदे, शेख सलीम शेख फरीद, संतोष बोचरे, सौ शारदाताई शर्मा, जयराम मुंडाले, प्रकाश कोंडे, जाधव मॅडम, तिवाने साहेब, लोखंडे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत ही सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.