मकर सक्रांतीचे मुहूर्तावर वाटले सावित्रीमाई फुलेंच्या विचाराचे वाण
माळेवाडी-अकलुज- दि.14 | महिलांच्या दृष्टीने संक्रांतीचे मुख्य आकर्षण म्हणजे हळदी- कुंकू कार्यक्रम. वाण’ द्यायचा विचार करतांना आपण विधवांना विसरतो आज माळेवाडी मधील संजयनगर मधील विधवांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना सावित्रीबाई फुले राजमाता जिजाबाई यांचे पुस्तक देवून येथोचित असा कार्यक्रम राष्ट्रवादी महीला काँग्रेस अध्यक्षा तसेच समता परीषद माध्यमातून सौ सीमाताई एकतपुरे यांनी आयोजन केले.
मकर संक्रांत हा भारतात साजरा केलेला लोकप्रिय सुवासिनीचा सण आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी या सणाचा उत्साह सगळीकडे सारखाच असतो. महिलांच्या दृष्टीने संक्रांतीचे मुख्य आकर्षण म्हणजे हळदी- कुंकू कार्यक्रम. हळदी- कुंकू करायचं म्हटलं की सगळ्यात आधी विचार होतो ते, यंदा संक्रांतीमध्ये काय वाण लुटायचं याचा. वाणाची वस्तू कशी युनिक आणि हटके असावी शिवाय सगळ्यांना तिचा फायदा व्हावा, अशी प्रत्येकीची अपेक्षा असते. परंतु ज्या महीला विधवा झालेल्या असतात त्याचा काय दोष हीच जाणून घ्या सगळ्यांच्या उपयोगी पडेल असं वाण. देता येईल यांच सकारात्मक विचार आज समाजाने केला पाहिजे याचं सकल्पनेतुन विधवांना पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी महीला कार्याध्यक्ष सौ जयाताई एकतपुरे सौ थोरात, सौ सुरेखा ऐकतपुरे, सौ भाग्यश्री ऐकतपुरे यावेळी विधवा महीला सगुणा साठे, राष्ट्रवादी महिला कार्यकारी सदस्य श्रीमती जनाबाई काळे, शालन गायकवाड, सुमन दुधभाते, जयश्री ऐवळे, आदी महीला उपस्थित होत्या सगळ्या महीलांना चेहर्यावरील भाव वाचणे सारखे होते आनंदाने सावित्रीमाईची विचाराचे वाण त्यानी घेतले