सावित्री-जिजाऊ जयंती निमित्य बंबट नगर येथील चौकाचे ज्ञानजोती सावित्रीबाई फुले चौक नामकरण
औरंगाबाद- दि. 09 | क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या व राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या ४२४ व्या जयंती निमित्त बीड बायपास स्थित बंबाट नगर येथील चौकास ज्ञानजोती सावित्रीबाई फुले चौक असे नामकरण करण्यात आले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष विरकर, प्रा. भरत काळे, महानगराध्यक्ष गजानन सोनवणे, शहर कार्याध्यक्ष गणेश काळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप घोडके, पश्चिम शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहर उपाध्यक्ष लक्ष्मण हेकडे, शहर उपाध्यक्ष किशोर लोखंडे, महिला आघाडी शहाराध्यक्षा सुभद्रा जाधव, सावता परिषदेचे अशोक गोरे, निरज बोरसे, काशिनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन उमेश उबाळे व राजू चौथनकर यांनी केले होते.
यावेळी उपस्थितांना संभोधित करतांना विविध वक्त्यांनी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्याकाळी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली नसती तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी केलेले कार्य आज जगाला कळाले नसते.
त्याकाळी वार्षिक उत्पन्न १२ लाख व आयकर २ लाख रुपये भरणाऱ्या जोतीराव यांनी संपूर्ण आयुष्य स्त्रीशिक्षण व जनजागृती करण्यात खर्चित केले मात्र तेव्हांच्या प्रस्थापित व्यवस्थेला हे रुचले नाही त्यांनी अतोनात छळ केला होत. कोट्याधीश असणाऱ्या फुले दांपत्याचा अखेर पाहिला असता त्यांचा अखेर खूप क्लेशदायक राहिला. त्यांनी कोणत्याही जातीव्यवस्था विरोधात प्रचार केला नाही .तर शिका आणि शिकू द्या हा विचार पेरण्याचे कार्य केले आहे. आज महिलांच्या हस्ते पुष्पहार व दीपप्रज्वलन होत आहे हे त्यांचीच पुण्याई आहे. सावित्रीबाई फुले यांचा विजय असो,राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज कि जय, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुलेंचा विजय असो, शाहू महाराज कि जय आदी घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास कडूळ यांनी केले होते. कार्यक्रमास रमेश बावस्कर, शिवाजी जाधव,रमेश हिवाळे, भगवान सोनवणे, ज्ञानेश्वर नवले,धनंजय दारुंटे, वंदना उबाळे, लता हिवाळे, सविता गवणे, सरला चौथनकर, पूजा रंधे, कल्पना सोनटक्के, दशरथ सांगळे.