माळी समाज राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय संमेलन शेगाव सोयर पुस्तिका विमोचन कार्यक्रम संपन्न
उपवर युवक-युवती परिचय संमेलन काळाची गरज- लक्ष्मणराव तायडे
खामगाव- दि. 09 | परिचय संमेलनाच्या माध्यमातून अनेकांचे विवाह जुळतात, अनेकांना आपल्या पसंतीचा उमेदवार शोधण्यासाठी घरबसल्या मदत होते. फक्त जिल्ह्यातून नव्हेत राज्यभरातून, देशभरातून उपवर युवक-युवतींना पर्याय उपलब्ध असतात, त्यामुळे परिचय संमेलन आता काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन मेळाव्याचे मार्गदर्शक माजी आ. लक्ष्मणराव तायडे यांनी केले. ते माळी समाज राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय संमेलन शेगाव 2022 सोयर पुस्तिका विमोचन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ.कृष्णराव इंगळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खामगाव विधानसभा मतदार संघाचे आ.अॅड.आकाश फुंडकर, माजी आ.बळीराम शिरसकार, माळी सेवा मंडळ अध्यक्ष प्रल्हाद बगाडे, सौ.स्वाती वाकेकर, सौ.कमल तायडे, सौ.सुनिता वावगे, संमेलन अध्यक्ष विजय वावगे, सचिव श्रीकृष्ण खंडारे, कार्याध्यक्ष विजय तायडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब इंगळे, माळी सेवा मंडळ सचिव प्रदीप सातव, अजय तायडे, इंजि.सुभाष निखाडे, इंजि.सदानंद खंडारे, उल्हास क्षीरसागर, अरविंद शिंगाडे, माळी समाज युवा नेते योगेश हजारे, युवा नेते जयेश वावगे, दत्तात्रय जावळकर, गजेंद्र गायकी, राजेंद्र बोचरे, संतोष निलखन, अनंत डवंगे, विजय राखोंडे, अरविंद बोचरे, पंकज सातव, विनायक जुमळे, विकास बगाळे, विवेक निमकर्डे, राजेंद्र भोपळे, क्रांतीसुर्य न्युजचे प्रविण बोचरे, बळीराम वानखडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी व सदस्य हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन अरविंद शिंगाडे, प्रास्ताविक अजय तायडे तर आभार प्रदर्शन संमेलाचे सचिव श्रीकृष्ण खंडारे सर यांनी केले. यावेळी समाज बांधवांचे कोविड नियमांमुळे निवडक उपस्थिती होती.
श्रम वेळ व पैसा वाचतो- मा.आ.कृष्णराव इंगळे परिचय संमेलन च्या माध्यमातून आपल्याला एकाच ठिकाणी दोन ते तीन हजार युवक युवतींचे परिचय प्राप्त होतात. त्या माध्यमातून घरबसल्या आपल्याला योग्य स्थळी, योग्य ठिकाणी संवाद अपेक्षेनुरूप साधता येतो. या माध्यमातून समाजाचा वेळ, पैसा, श्रम व मानसिक ताण सुद्धा वाचतो. करीता परिचय संमेलन समाजासाठी एक महत्वपुर्ण पर्वणी ठरले आहे. यावर्षीचे हे 28 वे वर्ष असून कार्यकर्त्यांनी समाजसेवेचा वसा असाच तेवत ठेवावा असे आवाहन माजी. आ. कृष्णराव इंगळे यांनी केले.
आवश्यक ती मदत करत राहणार-आ.अॅड. फुंडकर
माळी समाज सभागृह शेगाव साठी वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही आवश्यक ती मदत करत राहणार. असे प्रतिपादन आ.अॅड. आकाश फुंडकर यांनी केले. तसेच माळी समाजाचे कार्य प्रेरणादायी असून अन्य समाजाला सुद्धा या माध्यमातून प्रेरणा मिळते. असेही ते म्हणाले.
संमेलनाच्या माध्यमातून कार्यकर्ते घडतात- मा.आ.शिरस्कार
परिचय संमेलनाच्या माध्यमातून माळी समाजाचे राज्यभर नव्हे तर देशभर जाळे पसरत आहे. या माध्यमातून समाजाचे संघटन वाढत असून या कार्यातूनच अनेक कार्यकर्ते पुढे आले आहेत. ऐवढेच नव्हे ते नावारूपास आले असून समाज बांधवांनी अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सर्वांच्या सहकार्याने संमेलन यशस्वी- विजय वावगे
माळी समाज युवक-युवती परिचय संमेलन 2022 चे अध्यक्ष म्हणून सन्मान मिळाला. मला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य व समाज बांधवांचे सहकार्य लाभले. त्यामुळेच सर्वांच्या सहकार्याने हा संमेलनाचा कार्यक्रम ऐनवेळी ऑनलाईन पद्धतीने आम्ही आपल्यासमोर सादर करू शकलो. फक्त ऑफलाईन पद्धतीने परिचय संमेलन, सोयर पुस्तीकेचे विमोचन निवड मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले हे श्रेय सर्व समाज बांधवांच्या चरणी अर्पण करतो. असे प्रतिपादन संमेलन अध्यक्ष विजय वावगे यांनी केले.
यावेळी कोविड नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर आज, उद्या आणि परवा सुमारे 400 युवक-युवतींनी आपले 30 सेंकदाचे परिचयाचे व्हिडीओ मंडळाकडे पाठविले असून त्याची लिंक एका अॅपवर डाऊनलोड केली असून या लिंक च्या माध्यमातून राज्यभरातील समाज बांधवांना त्यांचा परिचय ऑनलाईन पद्धतीने करून घेता येणार आहे. सदरची लिंक सर्व समाज बांधवांच्या व्हॉट्सअॅप वर टाकली असून ही अॅप विवेक निमकर्डे गोंधनापूर येथील युवकाने तयार केली आहे. सदरचे व्हिडीओ कॉपी सुद्धा करता येणार नाही व कुठे लिंक सुद्धा होणार नाही याची खात्री सुद्धा त्यांनी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा व मंडळाचे सचिव प्रदिप सातव यांनी केलेल्या कार्याचा गौरव सुद्धा सत्कार करून करण्यात आला.
दि.8 जानेवारी रोजी माळी समाज राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय संमेलन 2022 शेगाव कार्यक्रमामध्ये माळी समाज युवा संघटन संदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल माळी समाजाचे मार्गदर्शक मंडळी व आ.अॅड.आकाश फुंडकर यांच्या सह मंडळाचे पदाधिकारी यांच्याहस्ते माळी समाज युवा नेते योगेश हजारे, युवा नेते जयेश वावगे, दत्तात्रय जावळकर यांचा सहृदय सत्कार केला व कौतुक करून शाबासकीची थाप पाठीवर दिली. हे संघटन गावागावात करा असे आवाहन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.