आपला जिल्हा

जि.प.माळकरंजा शाळेत सावित्री-जिजाऊ महोत्सवाची सुरुवात

कळंब ता.3 | तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे दरवर्षीप्रमाणे सावित्री जिजाऊ महोत्सवाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत शाळेतील विद्यार्थ्यामधील विविध कलागुणांना वावमिळावा सुप्त कलागुण विकसित व्हावे या उद्देशाने सन 2018-19 पासुन सावित्री-जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

कोरोना मुळे गेल्यावर्षी खंड पडला होता. परंतु यावर्षी पुन्हा नव्या उत्साहात नियोजन करण्यात आलेले आहे. सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिन शिक्षणदिन व बालिका दिन म्हणुन साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेतील सर्व मुलींची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यानंतर भाषण, निबंध, स्मरणशक्ती, सुंदर हस्ताक्षर, सामान्य ज्ञान अशा क्रमाने रोज एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन प्राथमिक व उच्च प्राथमिक आशा दोन स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

स्पर्धेचा समारोप राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी 12 जानेवारी रोजी करण्यात येईल. प्रत्येक स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थाना प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष भोजने यांनी दिली. स्पर्धा पार पाडण्यासाठी सहशिक्षक श्री.हनुमंत घाडगे व शिक्षिका श्रीमती भारती सुर्यवंशी या विशेष सहभाग नोंदवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button