राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ बी सी विभाग – पैठण तालुका अध्यक्ष पदी प्रकाश दिलवाले यांची नियुक्ती
पैठण- दि. 02 |विविध सामाजिक विषयावर धडाडीने आक्रमक भूमिका घेऊन सामाजिक कार्य करणारे, समाज माध्यमातून सक्रिय असणारे श्री प्रकाश दिलवाले यांची नियुक्ती आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या ओ बी सी विभागाच्या पैठण तालूका अध्यक्ष पदी करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष श्री ईश्वर बाळबुधे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. श्री प्रकाश दिलवाले यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष श्री आनंदा ढोके यांनी प्रदेश उपाध्यक्ष श्री मनोज घोडके यांच्या मार्गदर्शनात केली. नियुक्ती पत्र प्रदान करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ बी सी विभागाचे शहराध्यक्ष श्री निशांत पवार पैठणचे आकाश रावस हे ही उपस्थित होते.
श्री प्रकाश दिलवाले यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. ओ बी सी विभागाचे शहर कार्याध्यक्ष श्री योगेश हेकाडे, शहर उपाध्यक्ष श्री सुरेश गाजरे, समता परिषदेचे शहरं अध्यक्ष अमोल तूपे यांनी अभिनंदन केले.











