राष्ट्रवादी महीला काँग्रेसची माळशिरस तालुका कार्यकारिणी जाहीर – नव्या महीला चेहऱ्यांना संधी
अकलुज | दि. 26 राष्ट्रवादी महीला काँग्रेसची माळशिरस तालुका कार्यकारिणी जाहीर; नव्या महीला चेहऱ्यांना संधी देत सर्वसमावेशक अशी प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर जिल्हा नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सौ सुप्रियाताई गुंड पाटील, सोलापूर निरीक्षक दिपालीताई पांढरे, जिल्हा कार्याध्यक्ष रंजना हजारे यांच्या सुचनेनुसार आज रोजी अकलुज येथे तालुका अध्याक्षा सौ. सीमाताई एकतपुरे यांनी माळशिरस तालुका राष्ट्रवादी महीला काँग्रेस जिल्हा सोलापूर, पहीली कार्यकारणी यादी जाहीर करून नियुक्त्या देण्यात आल्या.
“आज महीला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यशस्वीरीत्या काम आहे. त्याचे बरोबरच महीला राजकारणात पण कमी नाही. प्रतिभाताई पाटील तर रुपालीताई चाकणकर यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनातील राजकीय क्षेत्रात नावलौकिक केले. चुल आणि मुल यामध्ये अडकून न राहता आज विविध सामाजिक आणि राजकीय पद भुषविले पाहिजे. त्यासाठीच आज आपली पहीली नियुक्ती पत्र देत आहोत मला जिल्हाध्यक्ष सौ सुप्रियाताई गुंड पाटील यांनी अधिकार प्रधान करुन दिल्याप्रमाणे मी खालील प्रमाणे नियुक्ती जाहीर करत आहे,” असे नियुक्ती देताना तालुका अध्यक्ष सौ. सीमाताई एकतपुरे ह्या म्हणाल्या
तालुका प्रसिद्धीप्रमुख सौ वैशाली ओंकार अडत
तालुका उपाध्यक्ष सौ सुचिता शेंडे
तालुका कार्याध्यक्ष सौ शशिकला देवकर
अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शमशाद बेगम शिकलगार
अल्पसंख्यांक उपाध्यक्ष कौसर नदाफ
संजय नगर कार्याध्यक्ष जयश्री एकतपुरे
संजय नगर सरचिटणीस भाग्यश्री एकतपुरे
संजय नगर सदस्य सगुना साठे