संघटीत होवून समाजाचे प्रश्न सोडवा-प्रल्हाद बगाडे ; माळी समाज युवा संघटन संदर्भात गवंढाळा, अकोली व लाखनवाडा येथे बैठक संपन्न
खामगाव- दि. 24 | माळी समाज हा खामगाव मतदार संघात फार मोठ्या प्रमाणात असून आपला समाज हा पोट जातींमध्ये विभागला गेला आहे. या पोट जाती एकत्र करून समाजाचे संगघटन निर्माण करावे व समाजाची प्रगती साधावी सोबतच आजचा युवक हा उद्याचे भविष्य आहे. त्यांच्या हातात समाजाची धुरा दिल्यास ते इतिहास घडवू शकतात. त्यामुळे माळी सेवा मंडळ खामागाव च्या मार्गदर्शनाखाली माळी समाज युवा संघटन संदर्भात गाव तेथे शाखा उघडाव्यात असे प्रतिपादन माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद बगाडे यांनी केले. ते गवंढाळा, अकोली व लाखनवाडा येथील माळी समाज युवा संघटन बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी माळी समाजाचे युवा नेतृत्व अजय तायडे, प्रा. नरेंद्र वानखडे, योगेश हजारे, प्रा. अमोल काळे, सुटाळा खुर्द. उपसरपंच जयेश वावगे, पंकज सातव, प्रविण बोचरे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी माळी सेवा मंडळ खामागाव च्या मार्गदर्शनाखाली गावागावात युवा शाखा गठीत करण्यासंदर्भात महिती देण्यात आली. तसेच माळी बहुल 60 ते 65 गावांमध्ये युवा संघटन निर्माण करण्याच्या मोहिमेला प्रत्येक गावातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रीया युवा तरूणांनी या बैठकीत दिली आहे.
या प्रसंगी गवंढाळा येथील माळी समाज युवा संघटनेचे अमोल राऊत, विजय राऊत, गणेश अढाव, गजानन बंड, संतोष ढक, वैभव राऊत, ज्ञानेश्वर इंगळे, राहुल इंगळे, गोपाळ इंगळे, आशिष सदर, अमोल काळे, निलेश काळे, राहुल राऊत, श्रीकृष्ण राखोंडे, संतोष भिवडे, आत्माराम इंगळे, भिकाजी ठक, ज्ञानदेव इंगळे, सचिन इंगळे, भारत माहुलकार, अमोल उनाळे, गोपाळ अढाव, सागर राखोंडे, तुकाराम मानकर, गजानन राऊत, कैलास सदर, सचिन काळे, योगेश बोचरे, ऋतिक इंगळे, भानुदास बोचरे, अमर काळे, गौरव राऊत, सुरज खंडारे, संतोष तायडे, ज्ञानेश्वर उमाळे, वसंता राऊत अकोली येथील श्रीकृष्णा करांगळे, विष्णु करांगळे, अनंता करांगळे, लाखनवाडा येथील कृष्णा बंड, अक्षय राऊत, शिवा राऊत, आकाश वानखडे, गजानन बंड, राजुधन आमले, विजय बोचरे, विठ्ठल बोचरे, गोपाळ वानेरे, राजु वानखडे, विजय खंडारे, गौरव इंगळे, अंकुश इंगळे, रामेश्वर राऊत, दत्तात्रय बोदडे, गोपाल बोचरे, ओम वानखडेे, अनिल इंगळे, स्वप्नील इंगळे, महेश उमाळे, गणेश राऊत, देवानंद बोचरे, निंबाजी इंगळे, गणेश इंगळे, अरूण आमले, मोहन इंगळे, अमोल इंगळे, विशाल आमले, जगन्नाथ बोचरे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.