जि प प्रा शा माळकरंजा येथे थोर गणितज्ञ रमानुज यांची जयंती साजरी
कळंब (तारीख 22).तालुक्यातील मौजे माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे थोर गणितज्ञ डॉक्टर रमानुज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रामानुज यांच्या बद्दल माहिती सांगण्यात आली. प्रश्नमंजुषा द्वारे विद्यार्थ्यांनी तयार केलेले गणिताचे प्रश्न विचारून कुतूहल जागृत करण्यात आले. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातूनही गणिताबद्दल जागृती करण्यात आली. चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी कुमारी अंजली गुरव, वैष्णवी भोपी, समृद्धी वाघमारे, नंदिनी कवडे, अर्पिता माने, मंजुषा लोमटे, कुमार वैभव शितोळे, सार्थक कुलकर्णी ,रोहन माने ,राजवीर वाघमारे ,यांच्या निवडक उत्कृष्ट चित्रांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.शाळेतील गणित विषयाच्या शिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री संतोष भोजने,श्री हनुमंत घाडगे उपस्थित होते.