गाव तिथे शाखा मोहिमेत सहभागी व्हा-दत्तात्रय जावळकर
खामगाव- दि. 22 | माळी सेवा मंडळ खामगाव च्या मार्गदर्शनाखाली माळी समाज युवा संघटन संदर्भात आंबेटाकळी व आसा दुधा येथे युवकांची बैठक संपन्न झाली. खामगाव माळी समाज युवा संघटन करण्याच्या संदर्भात ठिक-ठिकाणी आम्ही गाव तिथे शाखा करीत स्थापना करीत आहोत. या उपक्रमात युवकांनी सक्रियपणे सहभागी होऊन गाव तिथे शाखा निर्माण कराव्यात, या माध्यमातून माळी समाजाचे संघटना बलशाली करावे व समाजाची शक्ती एकत्रित करून समाजाला समृद्धीकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन माळी समाजाचे युवा नेते दत्तात्रय जवळकर यांनी केले आहे. ते आंबेटाकळी येथे युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
हा कार्यक्रम काल दि.21 डिसेंबर रोजी सायंकाळी पार पडला. तत्पूर्वी आसा दूधा येथे सुद्धा माळी सवमाजातील युवा संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी माळी समाजाचे युवा नेते पत्रकार योगेश हजारे, सुटाळा खु.चे उपसरपंच जयेश वावगे,पंकज सातव यांनी सुद्धा युवा संघटनेची ध्येयधोरणे, युवा संघटन कशासाठी व का यासंदर्भात मार्गदर्शन केले. माळी सेवा मंडळ अध्यक्ष श्री.प्रलहादभाऊ बगाडे, सचिव श्री प्रदीपभाऊ सातव यांच्या सह सर्व जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व माळी समाज बहुल गावामध्ये गाव तिथे शाखा मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या बैठका सुरू आहेत.
आसा दुधा येथील गणेश वानखडे, मंगेश काळे, अनंता काळे, पुरूषोत्तम रौंदळे, गोपाल राखोंडे, गजानन वानखडे, सुनिल वानखडे, श्रीकृष्णा वानखडे, सचिन काळे, किरण काळे, वसंता काळे, सुरेश वानखडे, भागवत काळे, परमेश्वर काळे, शिवाजी काळे, सागर काळे, शिवा ढक, प्रभाकर वानखडे, मारोती काळे, केशव काळे, ओम वानखडे, महादेव रौंदळे, रमेश वानखडे यांची उपस्थिती होती तर आंबेटाकळी येथे नामदेव भड, गणेश बोबडे, विजय इंगळे, प्रमोद इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, श्याम भड, गोपाळ बोबडे, हरिभाऊ इंगळे, गणेश इंगळे, अरुण भड, विशाल क्षीरसागर, रवी बोबडे, अमोल इंगळे, प्रकाश इंगळे, ज्ञानेश्वर भड, विठल इंगळे, पवन इंगळे, संतोष उमाळे, रामेश्वर भड, अनंता राज, गोपाळ इंगळे, गोपाळ काकड, महेश इंगळे, संदीप इंगळे, भिका इंगळे या तरुणांची उपस्थिती होती.