ओ.बी.सी.आरक्षणासाठी समता परिषदेच्या वतीने साक्री तहसीलदार यांना निवेदन
साक्री- दि. 22 | ओ.बी.सी. समाजाला हक्काचे आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
“नो रिजर्व्हेशन,नो इलेक्शन” ही भूमिका समता परिषदेने घेतली आहे,तसेच केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात इम्पेरीकल डाटा देण्यात टाळाटाळ करत आहे,केंद्र सरकारने ओ.बी.सी समाजाचे हक्क डावलण्याचा प्रयत्न चालवला आहे, मा.ना.छगनरावजी भुजबळ, मा.खा.समीर भुजबळ, विभागीय अध्यक्ष-बाळासाहेब कर्डक यांच्या मार्गदर्शनाने बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी स.११ वाजता समता परिषदेच्या वतीने साक्री तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी समता परिषदेचे पदाधिकारी , समता सैनिक यांच्या निवेदनात सह्या करून निवेदन देण्यात आले प्रसंगी धुळे जिल्हाध्यक्ष-राजेश बागुल,जिल्हाउपाध्यक्ष-प्रकाश शिरसाठ, जि.प.सदस्य-डॉ. नितीन सुर्यवंशी, मा.किशोर वाघ,मा.गिरीश नेरकर,मा.सयाजीराव ठाकरे,मा.भैय्या साळवे,चेतन खैरनार,रविंद्र खैरनार(पप्पुमाळी) सतीष पेंढारकर,मा.भैय्या शिंदे,कांतीलाल माळी,साक्री ता.अध्यक्ष-सतीश बाविस्कर, कार्याध्यक्ष-पंकज सोनवणे, धर्मराज वाघ,अमोल अहिरे,वैभव कापडणीस,ऋषिकेश मांडोळी,राजु माळी,सुरेश सोनवणे,दिपक भदाणे आदी. उपस्थित होते.