आपला जिल्हा

संजय गांधी निराधार योजना तालुका सदस्यपदी संतोष बोचरे यांची नियुक्ती

खामगाव- दि. 19 | तालुक्यातील मांडका गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते संतोष जगन्नाथ बोचरे यांची संजय गांधी निराधार योजना खामगाव तालुका सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

फुले शाहू आंबेडकर विचारांचा वसा घेत संतोष बोचरे हे ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, आरोग्यविषयक, सामाजिक, शैक्षणिक व शेतीविषयक कार्याची दखल घेऊन नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून मंजुरात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button