आपला जिल्हा

तिर्थक्षेत्र अरण विकासप्रश्नी सावता परिषदेच्या वतीने ना.अजित पवार यांना निवेदन

मुंबई-  दि- 15 | संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी समाधीस्थळ श्रीक्षेत्र अरणचा विकास आराखडा तयार करून भरघोस निधी द्यावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी भेट घेऊन अरण विकास प्रश्नावर चर्चा केली. कामात देव आहे असा संदेश देणारे संत मालिकेतील आद्य संत संतशिरोमणी सावता महाराज यांच्या भक्तीच्या महिम्यास साजेसा विकास होण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावरून विकास आराखडा तयार करून भरघोस निधी द्यावा अशी मागणी केली.

ना.अजितदादा पवार यांनी अतिशय तत्परतेने लगेचच ग्राम विकास मंत्रालय व सोलापूर जिल्हाधिकारी यांना याविषयी कार्यवाही करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सुचना पत्राद्वारे केली.

अरणच्या विकासासाठी सावता परिषद सातत्याने आग्रही असून समाज बांधवामधून उठाव व शासन दरबारी पाठपुराव्याच्या माध्यमातून प्रयत्नशिल आहे.

यावेळी कर्मयोगी संत सावता महाराज यांची मुर्ती ना.अजितदादा पवार यांना देऊन पुण्यतिथीच्या दिवशी पंढरपूरहून पांडुरंगाची पालखी अरणला येण्याची परंपरा कोव्हिड काळात देखील खंड न पडू देता अखंडित ठेवल्याबद्दल कल्याण आखाडे यांनी विशेष आभार व्यक्त केले. याप्रसंगी आ.सतिष चव्हाण यांचे बंधू प्रदिप चव्हाण व सावता परिषदेचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button