आपला जिल्हा
राष्ट्रवादी महीला काँग्रेस माळशिरस तालुकाध्यक्ष पदी सौ सीमाताई ऐकतपुरे यांची नियुक्ती
अकलूज-माळशिरस जि. सोलापूर- दि. 24 | अकलूज येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमाताई विजय ऐकतपुरे यांची राष्ट्रवादी महीला काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ.सीमाताई यांचा सामाजिक कार्य, तालुक्यातील महिलांशी असणारा संपर्क पाहून राष्ट्रवादी महिला काँग्रेस सोलापुर जिल्हाध्यक्ष अँड. सौ सुप्रिया शेखर गुंडपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सदर नियुक्ती जाहिर केली
या नियुक्ती साठी सोलापुर जिल्हाकार्याध्यक्ष रंजनाताई हजारे विशेष साथ लाभली. या निवडीचे जिल्हा निरीक्षक दिपालीताई पांढरे, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकरसाहेब, कार्याध्यक्ष रंजनाताई हजारे, उपाध्यक्ष सौ अश्विनी ताई भानवसे, विजय ऐकतपुरे, संजय ऐकतपुरे, भाग्यश्री ऐकतपुरे, अजय सकट, आदींनी स्वागत करत सीमाताईचे अभिनंदन केले.