शेवटी डॉ.प्रज्ञाताई राजीव सातव यांना विधानपरिषद उमेदवारी मिळाली
दिल्ली दि.15 | काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते डॉ. राजीव यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सदस्यपदी त्यांच्या पत्नी डॉक्टर राजीव सातव यांना संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात होती. त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी सुद्धा अनुकूल असल्याचे संकेत होते. पण ऐन वेळी रजनी पाटील यांना उमेदवारी देऊन या अपेक्षेवर पाणी फिरले होते.
दरम्यान कार्यकर्त्यांचा रोष शांत करण्यासाठी प्रज्ञाताईंना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष पदही देण्यात आले. परंतु तरीही कॉंग्रेस कार्यकर्त्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रातील राजीव सातव यांना मानणाऱ्या वर्गाचा रोष मात्र होताच .
त्यामुळेच त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषद उमेदवारी देण्याची मागणी होती. एकूणच सर्व परिस्थिती लक्षात घेता कॉंग्रेस पक्षातर्फे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी डॉ.प्रज्ञाताई राजीव सातव यांना जाहीर करण्यात आली. असे परिपत्रक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी आज काढले