विद्यार्थ्यांनी महाज्योती च्या योजनांचा लाभ घ्यावा -पिं राजा येथील सत्कार प्रसंगी अजय तायडे यांचे आवाहन
पि. राजा (खामगाव)- दि.15 | भारतीय राष्टीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी अजय काशीरामजी तायडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पि.राजा येथे सत्कार संपन्न झाला . त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उपरोक्त आवाहन केले.
इयत्ता ११वी सायन्समध्ये शिकत असलेल्या ओबिसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती पोर्टलवर नोंदणी करावी व जेईई , सिईटी व निट २०२३ साठी मोफत प्रशिक्षण घ्यावे , असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे यांनी केले आहे.
महाविकास आघाडी शासनाच्या महाज्योती पोर्टलवर सन २०२१-२२ मध्ये ११ वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या ओबिसी व्हिजेएनटी , एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. ओबिसी , व्हिजेएनटी , एसबीसी प्रवर्गातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यी परिस्थिती मुळे खाजगी शिकवणी लावू शकत नाही , म्हणून महाविकास आघाडी शासनाच्या वतीने ही योजना सुरू केली असून यामध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रतीचा टँब व दररोज ६ जि बी डाटा मोफत मिळणार आहे.
या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यंक सेल चे माजी अध्यक्ष मो. वसीमोद्दीन, जेष्ठ नेते प्रल्हादराव सातव, मा पं स. सदस्य महादेवराव बोदडे, पं स. माजी उपसभापती गोपाल सातव, रोहण देशमुख, माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदिपजी सातव, संतोष निलखन, कुंबेफळ चे सरपंच संतोष डांगे, जळका भडंग चे उपसरपंच किशोर कोंडे, पि राजा मा. उपसरपंच सचिन वानखडे, सुरेशभाऊ बगाडे, निपाणा मा. सरपंच गजानन बावस्कर, क्रु उ बा स खामगावचे माजी संचालक संजय वावगे, अनंत सातव,
समता परिषदेचे तालुका अध्यक्ष गणेश वानखडे, अशोक सातव, विपीन देशमुख, आवेशउल्ला खान, माजी. उपसरपंच भगवान बोंबटकार, मधुकर बगाडे, राजुभाऊ साटोटे, प्रल्हाद बोचरे, दयाराम वानखडे, निखील महाले, अमोल चरखे, गोपाल क्षिरसागर, योगेश सातव, अमोल वानखडे, विशाल सातव, सतीष शहाणे, उमेश चोपडे, मारोती बोदडे, दिपक वानखडे, यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .