आपला जिल्हा

कु. साक्षी सुभाष चोपडे हिचे यश

खामगाव- दि. 13 | वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित अशा एमबीबीएस पदवी साठी शासना ची आयोजित वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट 2021 नुकताच निकाल जाहीर झाला त्या निकालांमध्ये सहकार विद्या मंदिर बुलढाणा ची कुमारी साक्षी सुभाष चोपडे राहणार नांदुरा हल्ली मुक्काम गौरा नगर सुटाळा बु हिने 720 पैकी 602 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले व आपला एम बी बी एस पदवीसाठी प्रवेश निश्चित केला. तिचे वडील शेगाव तालुका अंतर्गत जलंब पोलीस स्टेशन येथे हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असून माळी सेवा मंडळ खामगाव चे सचिव प्रदीप सातव यांची भाची तर नांदुरा येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीरामजी चोपडे यांची नात आहे ,ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि गुरुजन वर्ग यांना देते कुमारी साक्षी वर समाजातील अनेक व्यक्तींकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button