भुजबळ साहेब ऐक संघर्ष योद्धा हा कार्यक्रम महाराष्ट्रात राबवणार-बाळासाहेब करडक
निफाड- दि.१६ | भुजबळ साहेब यांच्या वाढदिवWसाच्या निमित्ताने अमूत महोत्सव आयोजित कार्यक्रम नांदुर्डी पालखेड ता.निफाड येथे व्याख्यान माला आयोजित अंतर्गत बाळासाहेब करडक बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष निफाड आमदार दिलीपराव बनकर होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये अ भा समता परीषद जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दादा खोडे ,समतादूत शिवाजीराजे ढेपले, जिप सदस्य यतीनजी कदम, तालुका अध्यक्ष विलास बोरस्ते, अनिल नळे, संतोष पुडं, समीर खैरे हे होते.
यावेळी बोलताना आमदार दिलीप बनकर यांनी भुजबळ साहेबांनी शेतकऱ्यांच्या साठी विविध योजनांची माहिती दिली. निफाड हा शेतीप्रधान तालुका आहे. तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न पालखेड डावा कालवा साठी कायम नेहमी प्रखर पणे भुमिका मांडतात. विविध विकास कामे मार्गी लावले. तसेच शिवाजी राजे ढेपले यांनी भुजबळ साहेब निफाड तालुक्यातील विकासासाठी बारकाईने लक्ष घालतात. त्याचे उदाहरण कांदा पिक द्राक्ष बाग पाणी पुरवठा लक्ष घालून मार्गाने सोडवण्यासाठी अग्रक्रमाने प्राधान्य देत आहे.
यावेळी उपस्थित व्याख्यानाला व्याखाते बाळासाहेब करडक यांनी फुलें शाहु आंबेडकर आणि भुजबळ साहेब महाराष्ट्र सदनिका काम झालेले आरोपातून निर्दोष सुटका शरदचंद्र पवार साहेब यांनी साहेबाना दिलेली साथ लाभली आमदार कपील पाटील यांनी साहेबांचा प्रश्न विधानसभा सभागृहात मांडला आणि ज्या समाजाचा नेता जेल मध्ये तो समाज रस्त्यावर ३आँक्टोबर २०१६रोजी १५लाख असे इतिहासातील एक नेतृत्व आपल्याला लाभले आगामी काळात ओबीसी समाजातील आरक्षण प्रश्न भुजबळ साहेब शरदराव पवार साहेब यांच्या माध्यमातून सोडतील यांत शंकाच नाही. ओबीसी समाजाने आपल्या नेतृत्व हे आपल्याला लाभले यावेळी नादुर्डी पालखेड गोरढाण निफाड मधील. कार्यक्रमाचे आयोजन योगेश निफाडे, आदेश जाधव,वैभव राऊत,ऋषिकेश राऊत,पवन खैरे,सुशील निफाडे, अमोल राऊत,गणेश निफाडे, राजू भाऊ निकम,संतोष आहेर,जितेश निकम, संतोष राऊत,
तर विशेष सहकार्य समीर खैरे,विकास जाधव,दगु शिंदे,गजीराम खापरे,राजेंद्र निफाडे,शामराव निफाडे,नारायण आहेर,राजू अहिरे,रोहिदास फुगट,गंगा दादा खापरे यांनी केले. यावेळी तालुकातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते